घरदेश-विदेशगाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांनी केली तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

गाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांनी केली तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!

Subscribe

श्रमिक ट्रेनसाठी नोंदणी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मजूर रामलीला मैदानात जमा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांची कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी जाण्याची धडपड सुरू असल्याचे सध्या चित्र संपुर्ण देशात बघायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये सोमवारी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे बघायला मिळाले आहे. गाझियाबादमधील रामलीला मैदानात उत्तर प्रदेशला जाणाऱ्या विशेष श्रमिक ट्रेनने आपल्या घरी जाता यावं, यासाठी हजारोंच्या संख्येने मजुरांनी तुफान गर्दी केली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी गाजियाबाद वरून ६ श्रमिक ट्रेन्स रवाना होणार आहेत. यापैकी ३ ट्रेन बिहारच्या मुज्जफरनगर, रकसोल आणि पाटणा तर ३ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, आजमगड आणि वाराणसीसाठी रवाना होतील. या ट्रेननी साधारण ७ हजार मजूर आपापल्या मायदेशी परतणार आहेत.

गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना श्रमिक ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी नोंदणी, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तसेच वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रामलीला मैदानात येण्यास सांगितले होते. जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. मात्र मजुरांची मोठ्या संख्येने झालेली गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन यावेळी होताना दिसले नाही. तसेत गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अडचणी येऊ लागल्याने मजुरांना पोलिसांनी पांगवले.

- Advertisement -

बिहारसाठी गाझियाबादहून तीन ट्रेन सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक ट्रेनमधून १ हजार २०० मजुरांना बिहारला पाठवण्यात येईल. सोमवारी साधारण ३ हजार ६०० मजुरांना बिहारला पाठवले जाईल. याशिवाय लखनौ, गोरखपूरच्या मजुरांनाही इथूनच रवाना केले जाईल. सकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती, पण आता जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. अशी माहिती गाझियाबादच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी दिली.


मुंबईत होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या महिन्याभरात ४०० टक्क्यांनी वाढली
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -