घरताज्या घडामोडीGlobal Natural Gas Crunch: सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅसच्या किंमती एप्रिलपासून होणार...

Global Natural Gas Crunch: सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅसच्या किंमती एप्रिलपासून होणार दुप्पट

Subscribe

जगभरात गॅसमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता (Global Gas Crunch) निर्माण होत आहे आणि याचा परिणाम भारतात एप्रिलमध्ये दिसू शकतो. देशात एप्रिल महिन्यापासून गॅसची किंमत (Domestic Gas Prices) दुप्पट होऊ शकतात. यामुळे सीएनजी (CNG), पीएनजी (PNG) आणि वीजेच्या किंमतीही वाढतील. शिवाय सरकारची फर्टिलाइजर सबसिडी बीलही (Fertilizer Subsidy Bill) वाढेल.

कोरोनामुळे प्रभावित झालेली जागतिक अर्थव्यवस्था सुधारत असताना ऊर्जेची मागणी वाढताना दिसत आहेत. परंतु २०२१ मध्ये त्याचा पुरवठा वाढवण्यासाठी पुरेशी पावले उचलली गेली नाहीत. यामुळे गॅस किंमतीत वाढ होत आहे. आयातित एलएनजीसाठी घरगुती उद्योग आधीच जास्त किंमत देत आहेत. याचे कारण लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स आहे, जिथे किंमती कच्च्या तेलासोबत जोडल्या आहेत. त्यांनी स्पॉट मार्केट खरेदी करमी केली आहे, जिथे बऱ्याच महिन्यांपासून किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

- Advertisement -

जेव्हा सरकार नॅच्युरल गॅसची किंमतीत बदल करेल, तेव्हा याचा परिणाम एप्रिलमध्ये पाहायला मिळले. इंडस्ट्रीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २.९ डॉलर प्रति एमएमबीटीयूहून वाढून ६ ते ७ डॉलर केले जाऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माहितीनुसार, खोल समुद्रातून निघणाऱ्या गॅसची किंमत ६.१३ डॉलरहून वाढून जवळपास १० डॉलर होईल. कंपनी पुढील महिन्यात काही गॅसचा लिलाव करणार आहे. यासाठी फ्लोर प्राइ़सला क्रूड ऑईलसोबत जोडले आहे, जे आता १४ डॉलर प्रति एमएमबीटीयू आहे.

देशात घरगुती गॅसची किंमत प्रत्येक वर्षाला एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये निश्चित होते. एप्रिलमधील किंमत जानेवारीपासून ते डिसेंबर २०२१च्या आंतरराष्ट्रीत किंमतीवर आधारित असते. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर एके जेना यांच्या माहितीनुसार, घरगुती नॅच्युरल गॅसची किंमत एक डॉलरने वाढल्यावर सीएनजीची किंमत ४.५ रुपये प्रति किलो वाढले. याचा अर्थ सीएनजीची किंमतीत १५ रुपये प्रति किलो वाढू शकते.

- Advertisement -

जेना पुढे म्हणाले की, सीएनजीच्या गाड्यांसाठी आता कॉस्ट आर्बिट्रेज पेट्रोलच्या तुलनेत ५५ टक्के आहे. जर पेट्रोलची किंमत वाढत गेली तर हे संतुलन कायम राहिले. परंतु तेलाची किंमत वाढली नाही, म्हणजे यामध्ये घसरण झाली तर स्थिती वेगळी होईल. जर कॉस्ट आर्बिट्रेज ४० टक्के म्हणजे यापेक्षा अधिक झाले तर सीएनजीमध्ये कन्वर्जन कोणताही फायदा होणार नाही.


हेही वाचा – Russia Ukraine Crisis: संयम ठेवा! चर्चेने रशिया-युक्रेनचा वाद सुटेल, UNSC बैठकीत भारताने व्यक्त केला विश्वास


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -