Goa assembly Election results 2022 : गोव्यासह अनेक राज्यात खिचडी निर्माण होऊ शकते – संजय राऊत

गोव्यात कुणालाच स्पष्ट बहुमत नसेल. गोव्यातील परिस्थितीबाबत कॉंग्रेसशी बोलण झाले आहे. गेल्यावेळी जी परिस्थिती गोव्यात २०१७ मध्ये निर्माण झाली, ती यंदा होणार नाही, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. माझे पी चिदंबरम यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गोव्यासाठी जी मदत करता येईल ती मदत करणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोव्यात कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल असाही अंदाज त्यांनी यावेळी मांडला. गोव्यासह अनेक राज्यात खिचडी निर्माण होऊ शकते असाही अंदाज त्यांनी मांडला.

गोव्यात २०१७ मध्ये कॉंग्रेस सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष असूनही गोव्यात कॉंग्रेसला सरकार स्थापन करता आला नाही. आमदारांच्या गळतीमध्ये गोव्यात कॉंग्रेसच्या तोंडी आलेला हिरावला गेला. त्यामुळेच कॉंग्रेस एवजी भाजपने गोव्यात सत्ता स्थापन केली. अनेक आमदार फुटल्याचा फटका कॉंग्रेसला बसला. त्यामुळे गोवा कॉंग्रेसचे प्रभारी असलेले पी चिदंबरम हे गोव्यात निकालाआधी पासूनच तळ ठोकून आहेत.

विधानसभा निवडणूक निकालाबाबत दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. सध्या पंजाबमध्ये आप पुढे आहे. उत्तराखंडमध्येही जोरदार टक्कर सुरू. गोव्यात स्थिती स्पष्ट नाही. उत्तर प्रदेशात भाजप पुढे आहे. छोट्या राज्यांचे निकाल लवकर येतील. गोवा आणि पंजाबसाठी आता अंदाज लावणे चुकीचे ठरेल. अखिलेश यादव आणि अलायन्स उत्तर प्रदेशात टक्कर देत आहे. दुपारनंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले.

पंजाबमध्ये स्थिती स्पष्ट नाही. संपूर्ण निकाल येईलपर्यंत यूपीत उद्या सकाळची वेळे. गोव्यात कोणालाही बहुमत नाही. उत्तर प्रदेशात मागून लढाई सुरू करूनही खिचडी अनेक ठिकाणी बनू शकते. फक्त गोवाच नव्हे. तर अनेक ठिकाणी सुरू होऊ शकते. पोस्टल बॅलटच्या मतांवर कल दिसत नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून मतमोजणी सुरू झाली, त्याला दोन तास लागतील. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ५ वाजेपर्यंत कल कळतील. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशन यादव यांची आघाडी चांगली टक्कर देत आहे.

अनेक ठिकाणी नोटाला मत पडली आहे. जेव्हा संपूर्ण मतदानाची आकडेवारी पुढे येईल. लोकांना नोटाचा पर्याय का निवडावा लागतो हा सगळ्याच राजकीय पक्षांसमोरील प्रश्न आहे. गोव्यात आम्ही पूर्ण काम केले होते. आमच्या लोकांनी मेहनत केली होती. मणीपूरलाही आमचे खासदार जाऊन बसले होते. गोव्यातही स्वतः आदित्य ठाकरे आले होते. ही सुरूवात आहे आमच्या पक्षाची महाराष्ट्राबाहेर जाण्याची. कोणताही पक्ष राज्याबाहेर जातानाची धडपड आहे. ही आम्ही सुरूवात केली आहे, पक्ष बाहेर नेण्याची. ही सुरूवात आम्ही पुढे नेत राहू. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात नाराजी होती. आदित्य ठाकरे यांनीही सभा घेतली होती. गेल्यावेळी जे गोव्यात झाले ते यंदा होणार नाही.

पी चिदंबरम यांच्याशी फोनवरून बोलणे

गोव्यात माझी बोलणी ही पी चिदंबरम यांच्याशी झाली होती. त्यांचे दोन ते तीन वेळा फोन आले होते. गोव्यातील परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. गोव्यात जी मदत महाराष्ट्रातून लागेल ती मदत देण्याचे आश्वासन आम्ही दिल्याचेही ते म्हणाले.

गोव्यातील सुरूवातीच्या आकडेवारीनुसार भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात एकुण ४० जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. गोव्यात २१ जागांवर बहुमताचा आकडा हवा आहे. पण सध्याची आकडेवारी पाहता गोव्यात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.