घरताज्या घडामोडीIndian Railway Recruitment 2022: दहावी पास झालेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या...

Indian Railway Recruitment 2022: दहावी पास झालेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख?

Subscribe

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी खुशखबर आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध भागांसाठी एकूण ६८ पदांसाठी भरती काढली आहे. १० वी पास झालेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिसशीपसाठी जवळपास ५० टक्के नंबरसह १० पास झालेले उमदेवार अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२२ आहे. त्याचप्रमाणे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी rcf.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

कोणत्या पदांसाठी रिक्त जागा?

फिटर – ८ पदं
वेल्डर – २ पदं
मशीनिस्ट – १५ पदं
पेंन्टर – १७ पदं
सुतार- ५ पदं
मेकॅनिक – ३ पदं
इलेक्ट्रिशियन – ८ पदं
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ९ पदं
एसी आणि रेफरी मॅकेनिक – १ पदं

- Advertisement -

अशा एकूण ६८ पदांसाठी जागा रिक्त असून इच्छुकांनी अर्ज भरावे. अर्जासाठी १० वी पास असलेल्या उमदेवारांसाठी बोर्डाने आणि राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदद्वारे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जारी होणं खूप महत्त्वाचं आहे. वयोमर्यादा १५ वर्षे ते २४ वर्षे असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्यांना रेल्वेच्या संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकतात. तसेच ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात.


हेही वाचा : OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी १९ जानेवारीला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -