सणांच्या काळात घर खरेदी करायचा विचार असेल तर टाटा हाउसिंगने एक ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्हाला गृह कर्ज ४ टक्क्यांपेक्षा कमी टक्क्यांमध्ये मिळणार आहे. टाटा हाउसिंगने या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे गृह कर्जावर एका वर्षासाठी ३.९९ टक्के व्याज असणार आहे. तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च कंपनी करणार आहे. ही योजना २० नोव्हेंबरपर्यंत १० प्रकल्पांसाठी वैध आहे.
बुकिंगनंतर मालमत्तेवर आधारीत २५,००० ते आठ लाख रुपयांपर्यंतचं गिफ्ट व्हाउचर ग्राहकांना मिळतील, असं टाटा हाऊसिंगने सांगितलं. १० टक्के भरल्यानंतर आणि मालमत्ता नोंदणीनंतर व्हाउचर देण्यात येणार आहेत. टाटा रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या काही महिन्यांत रिअल इस्टेट क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला होता, परंतु आता काही सुधारणेची चिन्हे दिसू लागली आहेत. ते पुढे म्हणाले की, रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारने आणि आरबीआयने अनेक पावले उचलली आहेत आणि आता घर खरेदीदारांना मदत करण्याची खासगी क्षेत्राची वेळ आहे. रिझर्व्ह बँकेने कोरोना कालावधीत रेपो दरात सतत कपात केली आहे. यामुळे व्याज दर कमी करण्यासाठी बँकांवर दबाव आहे. तथापि, कर्ज घेणं खूप स्वस्त आणि सोपं झालं आहे.
हेही वाचा – मालामाल होण्याची सुवर्णसंधी! ५ आणि १० रुपयांची नाणी विका आणि लखपती बना