घरदेश-विदेशFarmers’ protest: ग्रेटा थनबर्गने भारताविरूद्ध मोहिम योजनेचे डॉक्युमेंट ट्विट करुन केले डिलीट

Farmers’ protest: ग्रेटा थनबर्गने भारताविरूद्ध मोहिम योजनेचे डॉक्युमेंट ट्विट करुन केले डिलीट

Subscribe

ग्रेटा थनबर्गने ट्विटरवर स्ट्राईक टूल किटचे स्क्रीनशॉट शेअर केले

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आता जागतिक सेलिब्रिटीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. रिहाना यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेतकरी आंदोलनशी संबंधित काही मजकूर शेअर केला होता. त्यानंतर यासोबतच पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने देखील भारतातील शेतकऱ्यांच्या निदर्शनात एकजूटीने उभे आहोत असे सांगितले. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या शेतकरी आंदोलनासंदर्भात एक अक्षरही न काढणाऱ्या भारतीय सेलिब्रिटी देखील आता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना दिसताय. दरम्यान, या आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचे गुगल डॉक्युमेंट्स ग्रेटाने ट्विटरवरून शेअर केले होते आणि नंतर ते डिलीट देखील केले आहेत. अशी माहिती भाजपाकडून देखील देण्यात आली आहे.

- Advertisement -

असे म्हटले होते शेअर केलेल्या डॉक्युमेंटमध्ये…

ग्रेटा थनबर्गने ट्विटरवर स्ट्राईक टूल किटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये डॉक्यूमेंटचे टायटल ‘ग्लोबल फार्मर्स स्ट्राईक-फर्स्ट वेव्ह’ असे आहे. भारतीय दूतावासासमोर आंदोलन करा, तसेच अदानी आणि अंबानी यांच्या ऑफिससमोर आंदोलन करा. २६ जानेवारी हा एकत्रितपणे जागतिक स्तरावर आंदोलन करण्याचा दिवस आहे. आपण जेथे असाल तेथे स्थानिक ठिकाणी आपले समर्थन दाखवा. आपल्या शहरात, राज्यात, देशात निषेध होत असल्याचे शोधा आणि सहभागी व्हा. यासह स्वतः एखादे आयोजन करा, असे या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले आहे.

यासह ग्रेटाने शेअर केलेल्या डॉक्युमेंटमध्ये तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला फॅटिस्ट सत्ताधारी पक्ष असेही संबोधले असल्याचे सांगितले जात आहे. आस्क इंडिया व्हाय असा शीर्षकाखाली ग्रेटाने हे डॉक्युमेंट असून शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवरून समर्थन देण्याकरता हे नियोजन होते. लोकांना भारतीय दूतावास, स्थानिक सरकारी कार्यालये यासह अदानी आणि अंबानी यांच्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येऊन निषेध करण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला होता. यासह २६ तारखेवर लक्ष केंद्रित करून शक्य तितक्या कमी वेळात निषेध कऱणारी आंदोलनाचं आयेजन करा. कारण सुरू असलेले हे प्रकरण लवकर संपेल असे दिसत नाही, असेही ग्रेटाने या शेअर करून डिलीट केलेल्या डॉक्युमेंट्समध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -