घरक्राइमअंबड : भरवस्तीत खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले; टोळीयुद्धात सराईत गुन्हेगारचा अंत

अंबड : भरवस्तीत खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले; टोळीयुद्धात सराईत गुन्हेगारचा अंत

Subscribe

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत पुन्हा एका खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर परिसरात भरवस्तीत रात्री ९ वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या अक्षय जाधव या सराईत गुन्हेगाराचा डोक्यात कोयत्याने वार करून खून केला आहे. भरवस्तीत घडलेल्या या थरारनाट्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना अटक केली आहे.

शहरात घरफोडी, चोरी, हाणामारी, जीवघेणे हल्ले, छेडछाड अश्या घटनांची मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालयचे दिसून येत आहे. त्यातच डाट लोकवस्तीच्या ठिकाणी टवाळखोरांचाही वावर वाढला असून त्यांच्या कडून होणार्‍या सततच्या मारामार्‍या, टवाळखोरी आदींमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अश्यातच अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथे भरवस्तीत खुनाची घटना घडली आहे. अक्षय जाधव याचा संशयित तन्मय गोसावी आणि आकाश साळुंखे यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. याचाच जाब विचारण्यासाठी गेला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तन्मय गोसावी व आकाश साळुंखे हे अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथील आरोग्य केंद्राच्या समोर बसलेले असताना अक्षय उत्तम जाधव हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वादावादीला सुरवात झाली. काही वेळात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान,  संशयित तन्मय गोसावी याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने अक्षय जाधव याच्या डोक्यात जबरी वार केला. अक्षय च्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. अखेर तो जवळच असलेल्या एका घराच्या बाल्कनीत जाऊन लपला. यावेळी गोसावी व साळुंखे हे त्याच्या मागे पळाले, त्या दोघांना अक्षय बाल्कनीत लपल्याचे आढळून आले. अक्षय पुन्हा तावडीत सापडल्याने गोसावी आणि साळुंके या दोघांनी पुन्हा एकदा अक्षयच्या डोक्यात कोयत्याने वार केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एक मोठा दगड अक्षयच्या डोक्यात घातला

- Advertisement -

स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली असता, अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी अक्षय जाधव यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अक्षयला मृत घोषित केले. दरम्यान, मयत अक्षय जाधव विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या घटनेत नेमकं काय घडलं याचा पोलीस सखोल तपास करत असल्याची माहिती आहे.

टवाळखोरांना मोकळे रान 

- Advertisement -

शहरातील प्रत्येक चौकात किंवा गल्लीबोळात सध्या फक्त गावगुंड टवाळखोरांचाच बोलबाला आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक भागात नागरिक दहशतीच्या वातावरणात आहे. रात्र-रात्रभर टवाळखोरी करणे, धिंगाणा घालणे, आपल्या अड्ड्यावरच खुलेआम मद्यपान करणे, अश्लील चाळे-शेरेबाजी करणे, महिलांची छेडछाड करणे आदि बाबी करण्यासाठी टवाळखोरांना जणू पोलीस प्रशासनाने खुली सूटच दिली आहे की काय ? अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अस्तीत्वात आहे की नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -