घरदेश-विदेशपंतप्रधानांच्या मतदारसंघात लागले, 'गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो' चे पोस्टर!

पंतप्रधानांच्या मतदारसंघात लागले, ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ चे पोस्टर!

Subscribe

गुजरातमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांवर हल्ले होत आहेत. याचे पडसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत उमटले आहेत. मोदींविरोधात पोस्टरबाजी करत निदर्शने केली जात आहेत.

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर उत्तर भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता वारासणीमध्ये उमटताना दिसत आहेत. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे या राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. गुजरातमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांवर हल्ले होत आहेत. याचे पडसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत उमटले आहेत. वाराणसीत ठिकठिकाणी ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोड़ो’, असा मजकूर असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत.

पोस्टर्सच्या माध्यमातून दर्शवला विरोध 

हे पोस्टर्स युपी-बिहार एकता मंच यांच्यावतीने लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स वारासणीतील अनेक भागांमध्ये लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सला धमकी वजा सूचनेच्या स्वरूपात लावण्यात आले आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून गुजरात तसेच महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशातील लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केला होता. त्यानंतर स्थानिकांनी उत्तर भारतीयांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीय बिहार आणि उत्तर प्रदेशात परतले.

- Advertisement -

गुजराती-मराठी भाषिकांना दिली धमकी 

युपी-बिहार एकता मंचानं पोस्टरमधून थेट पंतप्रधान मोदींना इशारा देण्यात आला आहे. ‘गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात बनारसमधून ऐलान-ए-जंग’ असा मजकूर या पोस्टरवर आहे. यामधून वाराणसीतील गुजराती आणि मराठी भाषिकांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला गेला आहे. ‘बनारसमध्ये वास्तव्यास असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या लोकांनी आठवड्याभरात बनारस सोडून जावं. अन्यथा परिणामांना सामोरं जाण्यास तयार रहावं,’ अशी धमकी या पोस्टरद्वारे देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -