घरदेश-विदेशVideo : भाजप प्रदेशाध्यक्षांनी फडकवला उलटा झेंडा!

Video : भाजप प्रदेशाध्यक्षांनी फडकवला उलटा झेंडा!

Subscribe

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करतेवेळी जितू वघाणी यांनी चक्क उलटा राष्ट्रध्वज फडकवला.

शनिवारी २६ जानेवारीला देशभरात असंख्य ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काल देशाच्या कानाकोपऱ्यात ध्वजारोहण केले गेले. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनीसुद्धा आपापल्या प्रभाग कार्यालयात किंवा एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, अशाच एका ध्वजारोहण प्रसंगाचा व्हिडिओ इंटरनेटवर जरा जास्तच लक्षवेधी ठरतो आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष जितू वघाणी यांचा हा व्हिडिओ आहे. जितू वघाणी यांनी चक्क उलटा राष्ट्रध्वज फडकवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत जितू वघाणी यांनी फडकवलेला तिरंगा ध्वज चक्क उलटा (सर्वात वर हिरवा रंग, मग पांढरा रंग आणि खालच्या बाजूला केशरी रंग अशा उलट पद्धतीने) लावल्याचं स्पष्ट दिसत आहे. ‘प्रत्यक्षात खांबावर ध्वज लावण्याचं काम जरी वघाणी यांनी केलं नसलं, तरी प्रमुख अतिथी आणि एक राजकीय नेता म्हणून त्यांनी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत ना? याची खातरजमा करुन घ्यायला हवी होती’, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत. 

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनाच्याच निमित्ताने मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात काँग्रेस मंत्री इमरती देवी यांना भाषण वाचता आले नाही, म्हणून त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. कमलनाथ सरकारमधील महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री इमरती देवी या ग्वालियर जिल्हा मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. मात्र, लिहून दिलेले भाषणही वाचता न आल्यामुळे विरोधी पक्षांकडून अप्रत्यक्षपणे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले. त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली.

आता त्यापाठोपाठ व्हायरल झालेला जितू वघाणींचा हा व्हिडिओ पाहिल्यावर, ‘काँग्रेसच्या मंत्र्यांना भाषण वाचता येईना आणि भाजप नेत्यांना झेंडा फडकावता येईना…’ असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -