घरदेश-विदेशगुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; आमदाराचे सदस्यत्व कोर्टाकडून रद्द

गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का; आमदाराचे सदस्यत्व कोर्टाकडून रद्द

Subscribe

माणेक यांच्याविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराने आक्षेप घेत गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. काँग्रेसच्या उमेदवाराने आरोप केला होता की, माणेक यांनी उमेदवारी अर्ज भरत असताना खूप चूका केल्या होत्या.

लोकसभा निवडणुकी दरम्यान गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाने भाजप सरकारला मोठा धक्का बसला आहे. गुजरात हायकोर्टाने द्वारकाचे भाजप आमदार पबुभा माणेक यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. तसेच गुजरात हायकोर्टाने द्वारका मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. २०१ ७ मध्ये द्वारका मतदार संघाचे भाजप आमदार पबुभा माणेक यांनी उमेदवारी अर्ज भरताना चूक केली होती. त्यामुळे कोर्टाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

- Advertisement -

भाजप आमदार माणेक यांच्याविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराने आक्षेप घेत गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. काँग्रेसच्या उमेदवाराने आरोप केला होता की, माणेक यांनी उमेदवारी अर्ज भरत असताना खूप चूका केल्या होत्या. आज याप्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश परेश उपाध्याय यांनी माणेक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, माणेक यांच्या वकिलांनी कोर्टाला दिलेला निर्णय चार आठड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावा अशी मागमी केली होती. जेणे करुन ते कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकतील. मात्र न्यायाधीश उपाध्याय यांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आहे.

दरम्यान, एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. त्यामध्येच आता गुजरात हायकोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे भाजपला धक्का बसला आहे. कोर्टाने माणेक यांचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे आता त्याजागी निवडणूक आयोगाने फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -