घरदेश-विदेशHAL Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये दरमहा ४३,००० पगारासह जॉबची संधी

HAL Recruitment: हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये दरमहा ४३,००० पगारासह जॉबची संधी

Subscribe

इच्छुक उमेदवार hal-india.co.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कोरोना महामारीदरम्यान अनेकांच्या नोकऱ्या जात असताना हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी भरतीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज एचएएलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार hal-india.co.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. एचएएल डिप्लोमा टेक्निशियनच्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर आहे.

१५ रिक्त पदांसाठी होणार भरती

एचएएलकडून प्रसिद्ध झालेल्या जाहीरातीनुसार या भरतीप्रक्रियेसाठी डिप्लोमा टेक्निशियन (मेकॅनिक) आणि डिप्लोमा टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) च्या १५ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ही सर्व पदे एससी, एसटी आणि ओबीसीसाठी राखीव आहेत. तसेच या पदांवर उमेदवारांची भरती ही टेन्योन बेसिसवर चार वर्षांसाठी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे उमेदवार अर्ज करण्यास ठरणार पात्र

ज्या उमेदवारांनी १०वीनंतर मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकलची पूर्णवेळ पदविका उत्तीर्ण केला आहे असे उमेदवार या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी पात्र असतील. या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी उमेदवारांसाठीची वयोमर्यादा कमाल ३१ वर्षे तर एससी आणि एसटीच्या पदांसाठीची कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा ४३ हजार रुपये एवढे वेतन दिले जाईल. यामध्ये १६ हजार ८२० बेसिक आणि पर्सनल पे आणि २६ हजार २८० रुपयांचे अन्य भत्ते आणि लाभ असतील.

तसेच ही परीक्षा बंगळुरू येथे आयोजित केली जाणार असून डिप्लोमा टेक्निशियन पदांसाठी उमेदवारांची निवड ही हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.


Indian Railway Recruitment 2020 : रेल्वेत विना परिक्षा ४ हजार ४९९ जागांसाठी भरती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -