घरदेश-विदेशलोकांनी दिल्या हार्दिकला 'हार्दिक शुभेच्छा'

लोकांनी दिल्या हार्दिकला ‘हार्दिक शुभेच्छा’

Subscribe

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल विवाह बंधनात अडकला आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील डुगसर गावात रविवारी हा विवाह सोहळा संपन्न झाला. हार्दिकच्या लग्नानंतर लोकांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्ममातून शुभेच्छा दिल्या आहेत.

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने आपली लहानपणाची मैत्रीण किंजल परिख हिच्याशी विवाह केला आहे. गुजरात येथील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील डुगसर गावात रविवारी हा विवाह सोहळा संपन्न झाला. हा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. यावेळी हार्दिक पटेलचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. आपल्या लढाईत आपली पत्नीही आपल्याला साथ देणार असे त्याने विवाहानंतर पत्रकरांना सांगितले. लग्नानंतर हार्दिकच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

शेवटच्या श्वासापर्यंत लढणार

माझ्या कौटुंबिक जीवनाचा हा दुसरा टप्पा आहे. प्रत्येकाला समान हक्क मिळायला हवा असा माझा निश्चय आहे. देशाच्या  नवनिर्माणासाठी आम्ही दोघे प्रयत्नशील असू. नवनिर्माणासाठी आम्ही दोघांनी एकत्र लढा देण्याचा विचार केला आहे. “आम्ही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वास असे पर्यंत लढू. आम्ही मागील अनेक वर्षांपासून प्रेम संबधात होतो म्हणून आमचे लग्न करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला.” असे हार्दिक म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -