घरदेश-विदेशबापरे! भारतातल्या इतक्या नोकऱ्या होणार कमी

बापरे! भारतातल्या इतक्या नोकऱ्या होणार कमी

Subscribe

शेतीचं उत्पन्न कमी झाल्यास त्याचा परिणाम दरडोई उत्पन्नावर होऊन शेती आणि उत्पादन क्षेत्राला जर याचा जास्त फटका बसलाच तर भारतावर बेरोजगारीचे संकट येण्याचा धोका

यंदा उष्णतेची तीव्र लाट भारतामध्ये पाहायला मिळाली. या तापमानवाढीचा तडाख्यामुळे माणसाच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच परंतु, या हवामान बदलाचा नोकऱ्यांवर देखील चांगलाच परिणाम होणार आहे. या उष्णतेमुळे हीट स्ट्रेसच्या त्रासाला सगळ्यांना सामोरे जावे लागणार असून वाढत्या उष्णतेमुळे २०३० पर्यंत भारतात ३ कोटी ४० लाख नोकऱ्या कमी होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे जगातील नोकऱ्यांमध्ये घट होणार असून या नोकऱ्या ८ कोटींवर येतील.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अहवाल

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सादर केलेल्या अहवालानुसार, या उष्माघाताचा भारत देशाला सर्वाधिक फटका बसण्याचा धोका आहे, असे सांगण्यात आले आहे. तसेच, भारतामध्ये बहुतांश लोकसंख्या शेती आणि उत्पादन क्षेत्रावर अवलंबून असल्याने बऱ्याच जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहे, असे देखील या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

…तर भारतावर बेरोजगारीचे संकट

भारताचे दरडोई उत्पन्नांपैकी शेतीचा हिस्सा १५ टक्के आहे. अशा स्थितीत शेतीचं उत्पन्न कमी झाल्यास त्याचा परिणाम दरडोई उत्पन्नावर होऊन शेती आणि उत्पादन क्षेत्राला जर याचा जास्त फटका बसलाच तर भारतावर बेरोजगारीचे संकट येण्याचा धोका असल्याचे नाकारता येत आहे.

तापमानवाढीचा जास्त फटका शेतीला

तामिळनाडूचे शेतीशास्त्रतज्ञ आर. मणी यांनी या शक्यतेबद्दल असे सांगितले की, हवामान बदल आणि तापमानवाढीचा सगळ्यात जास्त फटका शेतीलाही बसणार आहे. वाढत्या उष्म्यामुळे शेतीची उत्पादकता सुमारे ९ टक्क्यांनी खाली घसरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -