घरदेश-विदेशदेशात 'या' राज्यांमध्ये पडतोय मुसळधार पाऊस

देशात ‘या’ राज्यांमध्ये पडतोय मुसळधार पाऊस

Subscribe

देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाची माहिती आपण जाणून घेऊया.

मुसळधार पावसामुळे कित्येक राज्यांमध्ये पावसाने थैमान माजवले आहे. तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळ आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागात या पावसाने रौद्र रुप धारण केले आहे. गुजरातमध्ये हवामान विभागाने मंगळवारी हाय अलर्टचा इशारा देत सावधानता बाळगण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात मुंबई नंतर विविध पर्यटनस्थळी मुसळधार पाऊस होत आहे. तर, पुर्व आणि दक्षिण भारतातही मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे तीर्थयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. देशभरात पडणाऱ्या पावसाविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

गुजरात : सौराष्ट्रच्या चारही बाजूंनी पाणीच पाणी!

गुजरातच्या सौराष्ट्र भागात विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अमरेली जिल्ह्यामध्ये तर पूर आला आहे. त्यामुळे तेथील लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमनाथ जिल्ह्याच्या चार गावांमध्ये पुर्णपणे पाणी भरले आहे. राज्याच्या एकूण ३३ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. गुजरातच्या हवामान विभागाने बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र

महाराष्ट्रात मुंबई सोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील पर्यटनस्थळी पावसाने सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे महाबळेश्वरला सर्वात अधिक म्हणजे आतापर्यंत ३०० मिलीमीटर (मिमी) पावसाची नोंद झाली आहे. यानंतर लोणावळा-खंडाळामध्ये २९० मिमी पाऊस पडत आहे. रायगडमध्ये २६० मिमी पाऊस तर नाशिक आणि इगतपूरीमध्ये २२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या तालासारी, मोखदा आणि जाहार भागात अनुक्रमे २३०, २०० आणि १९० मिमी पाऊस पडला आहे. राज्यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस पडला. पण, सुदैवाने या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला नाही.

ओडिशा

ओडिशामध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच विभागांमध्ये इतके पाणी साचले आहे कि, रस्त्यांचे मार्ग देखील ओळखले जात नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘दक्षिण आणि पश्चिम ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे’. राज्याच्या प्रमुख नद्यांमध्ये पाणीचे प्रमाण वाढत आहे. तेथील स्थानिक प्रशासकीय अधिकारी बी. पी. सेठी यांनी सांगितले की, ‘राज्याच्या १२ जिल्ह्यांमध्ये रविवारी ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे’. राज्यात कालाहांडी आणि नौपाडा जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला आहे.

- Advertisement -

केरळ

मुसळधार पावसामुळे केरळच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम पडला आहे. पावसामुळे आतापर्यंत १३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. मलप्पुरम आणि कोट्टयम विभागात दोन लोकांचा पाण्यात बुडून  मृत्यू झाला. एर्नाकुलम आणि कोचीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एर्नाकुलममध्ये जिल्हा प्रशासनाने ३ हजार २५४ लोकांच्या वास्तव्यासाठी सुरक्षित ठिकाणी सोय केली आहे. कोची विमानतळावर २३ सेंटीमीटर पाण्याची नोंद करण्यात आली आहे, तर पिरावम मध्ये २२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. विमानतळाच्या जवळील विभागात १६ सेमी आणि अलूवामध्ये १५ सेमी पाण्याची नोंद करण्यात आली आहे. केएसआरटीसी बस स्टॅण्ड, कलूरमध्ये एलआयजी कॉलनी, शेनॉयज रोड, पोनोथ रोड (एर्नाकुलम उत्तर), सेंट विंसेट रोड, सेंट बेनाडिक्ट रोड आणि आणि चित्तुर रोड या विभागातील रस्ते पाण्यामध्ये डुबले आहेत.

उत्तराखंड

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्याच्या घाटामध्ये ढगफुटी झाल्यामुळे कित्येक घरे, दुकाणे वाहून गेली. ढगफुटीमुळे रतगावातील १० ते १५ दुकाने वाहून गेले. त्याचबरोबर १० वाहने देखील वाहून गेले. मुसळधार पाऊस आणि ढगफूटीमुळे चारधामला जाणाऱ्या तिर्थयात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत.

जम्मू-काश्मीर

पावसामुळे जम्मू-काश्मीरच्या रेयासी जिल्ह्यामध्ये वैष्णवी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने तो रस्ता बंद करण्यात आला आहे. रेयासीचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक ताहिर सज्जाद यांना दूर्घटनेत जीवितहानी न झाल्याची माहिती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -