घरदेश-विदेशआंध्र प्रदेशात राम नवमीला भीषण दुर्घटना; वेणुगोपालस्वामी मंदिरातील मंडपाला आग

आंध्र प्रदेशात राम नवमीला भीषण दुर्घटना; वेणुगोपालस्वामी मंदिरातील मंडपाला आग

Subscribe

आंध्र प्रदेश : रामनवमीच्या दिवशी पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील आंध्र प्रदेश मोठ्या अपघातातून वाचला आहे. आंध्र प्रदेशातील वेणुगोपाल मंदिर (Venugopal Temple) परिसरात रामनवमीनिमित्त भाविकांसाठी लावण्यात आलेल्या मंडपावर फटाके पडल्याने  आग लागल्याचे समजते. या आगीने थोड्याच वेळात संपूर्ण मंदिराला वेढले. आग एवढी भीषण होती की काही किलोमीटर दूर आकाशात काळ्या धुराचे लोट दिसत होते. आगीचे भीषण रूप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आज रामनवमीनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात पोहचले होते. मंडपाला आग लागल्याचे पाहुन भाविकांनी मंदिरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहीती मिळत आहे.  आगीची माहिती मिळताच पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात लोकांची ये-जा बंद करण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत मंदिराचे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. मंदिर परिसरात लागलेल्या भीषण आगीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

- Advertisement -

इंदूरमध्ये विहीर कोसळल्याची घटना
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी विहीर कोसळ्याची घटना घडली आहे. इंदूर येथील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळले आहे. त्यामुळे पायरीवर उभे असलेले लोक 50 फूट खोल विहिरीत पडले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवेदन जारी करून सांगितले की, या विहिरीत अडकलेल्या 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर इतर 9 जण सुरक्षित असून त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -