घरमहाराष्ट्रनाद करायचा नाय! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, गाळ्यांचे पत्रेही तुटले

नाद करायचा नाय! गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, गाळ्यांचे पत्रेही तुटले

Subscribe

पारनेर – प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तरुणांनी धुडगुस घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती फार चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून लोक येतात. गर्दी जमते. त्यामुळे कधी कधी गर्दी नियंत्रणाबाहेर की गेली राडेही होतात. काही हुल्लडबाज तरुणही गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ घालतात. त्यामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम राज्यातील कोणत्याही शहरांत असला तरीही त्याची माहिती राज्याच्या प्रत्येक काना-कोपऱ्यांत सहज मिळते. पारनेरच्या जवळे येथेही पैलवानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी झिंगाट धिंगाणा केला.

हेही वाचा – शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम,अबाल-वृद्धांची तुफान गर्दी

- Advertisement -

वाढदिवस किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हल्ली गौतमी पाटीलला आमंत्रित केलं जातं. तिच्या येण्याने कार्यक्रमात तुफान गर्दी होते. त्यामुळे तिच्या तारखा मिळवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजक रांगा लावून आहेत. त्यातच, ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रा सुरू असल्याने गौतमीच्या नृत्याला मागणी आहे. तिच्या नाजूक आणि दिलखेचक अदांनी अवघ्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय.

असाच एक कार्यक्रम पारनेर तालुक्यातील जवळे येथे जयदीप सालके आणि सौरव लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिने नृत्य करण्यास सुरुवात करताच उपस्थित प्रेक्षकांनी तिच्या गाण्यावर ठेका धरायला सुरुवात केली. हळूहळू सर्वच प्रेक्षक तिच्या अदाकारींवर बेभान होऊन नाचू लागली. नाचताना गर्दी अनियंत्रित झाल्याने अनेकजण ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांवर चढले, त्यामुळे या गाळ्यांचे पत्रेही फुटले. यामुळे वाद निर्माण झाला. या वादातून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ झाला.

- Advertisement -

हेही वाचा – व्हायरल व्हिडीओप्रकरणी गौतमी पाटीलची पोलिसांत धाव, महिला आयोगानेही घेतली दखल

गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. तिचे लावणीचे कार्यक्रम तुफान गाजतात. तिची लावणी पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात. तिचे काही कार्यक्रम फार वादग्रस्त ठरले होते. उपस्थितांकडून पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी अनेकांनी तिच्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याची मागणी केली होती. परंतु, तिने माफी मागितल्यानंतर हे प्रकरण निवळलं. काही दिवसांपूर्वी काही हुल्लडबाज तरुणांनी तिचा एक व्हिडीओ तिच्याही नकळत चित्रित केला. ती कपडे बदलत असतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल झाला. मात्र, याप्रकरणी राज्य महिला आयोगाने दखल घेताच पोलिसांनी कारवाई केली. या प्रकारामुळे ती भावूकही झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -