घरदेश-विदेशतब्बल १२ तासानंतर झाली मॉडेलची सुटका

तब्बल १२ तासानंतर झाली मॉडेलची सुटका

Subscribe

पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास

एका माथेफिरुने मुंबईच्या मॉडेलला बंदी बनवलेल्या मॉडेलला तब्बल १२ तासानंतर मुलीला सोडले. या घटनेनंतर पीडित मुलीला स्थानीक रुग्णालयात दाखल केल असून सध्या तिची प्रकृती स्थीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या माथेफिरुला पोलिसांनी अटक केले असून प्रेमभंग झाल्यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याची कबूली दिली आहे. भोपाळच्या मिसरोद भागामध्ये राहणाऱ्या या तरुणीच्या घरामध्येच तिला बंदी बनवण्यात होते. पीडित मुलगी बीएलएनएल चे माजी जीएमची मुलगी आहे. माथेफिरु तरुणाने यामुलीला तब्बल १२ तास एका रुम मध्ये बंदी करुण ठेवले होते. या तरुणाला बाहेर आणण्यासाठी पोलिसांनी मोबाईलवरुन त्याच्याशी संपर्क साधून त्याला बाहेर येण्याची विनंती करत होते. अखेर १२ तासानंतर त्याने रुमचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. रोहित सिंह असं या माथेफिरुचे नाव आहे. त्यांने या तरुणीला एका रुममध्ये आज सकाळपासून बंदी बनवून ठेवले होते. या मॉडेलच्या सुटकेसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु होते.

लग्नाला नकार दिल्याने उचलले पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, माथेफिरु तरुण या मॉडेलला आधीपासून ओळखत होता. या तरुणीवर लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळे त्यांने शेवटी तिला बंदी बनवले. त्याने तिच्यावर कैचीने वार करुन जखमी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या माथेफिरुने एक व्हिडिओ वायरल केला. त्यामध्ये तो तिच्यावर प्रेम करत असल्याचे म्हटले आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याचा हा परिणाम आहे असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले होते.

- Advertisement -

सकाळी ७ पासून तरुणीला केले बंदी
सकाळी ७ वाजल्यापासून त्याने या मॉडेलला बंदी बनवले होते. ज्या बिल्डिंगमध्ये ही तरुणी राहते त्याच घरात त्याने तिला बंदी बनवण्यात आले. मिसरोद भागामध्ये ही तरुणी राहते. हा माथेफिरु स्वत:ला गोळी मारण्याची धमकी देत होता.

पोलिसावर देखील केला हल्ला
घटनास्थळावर पोलिसांना पाहून या माथेफिरुने या तरुणीला मारण्याची धमकी दिली. या माथेफिरुशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या मिसरोद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी गोविंद सिंह राजपूतवर त्याने हल्ला केला. या माथेफिरुजवळ चाकू आहे. तो या तरुणीला काही इजा पोहचवू नये यासाठी पोलीस थोडी सावधानता बाळगत होते. आता मात्र या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -