घरदेश-विदेशप्रेयसीसाठी इंजिनिअरने केले बायकोच्या शरीराचे ७ तुकडे

प्रेयसीसाठी इंजिनिअरने केले बायकोच्या शरीराचे ७ तुकडे

Subscribe

प्रेयसीसाठी पेशाने इंजिनिअर असलेल्या साजिदने पत्नी बायकोचा खून करून तिच्या शरीराचे सात तुकडे केले आहे. सदर घटनेने नवी दिल्ली हादरून गेली आहे. बॉक्सचा साथीने पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे.

नवी दिल्लीमधील सविता विहार येथे इंजिनिअरने बायकोची हत्या करून सात तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणामध्ये नवी दिल्ली पोलिसांनी खुनी महिलेचा खुनी पती साजिद आणि त्याच्या दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत. २१ जुन रोजी पोलिसांना एका बॉक्समध्ये शरीराचे सात तुकडे सापडले. पण त्याची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश आले नाही. अखेर ज्या कंपनीचा बॉक्स आहे त्या कंपनीशी पोलिसांनी संपर्क साधला. त्यावेळी गुरगावमधील कंपनीने सदर बॉक्स हा जावेद अख्तर यांच्या नावे पाठवल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी थेट जावेद अख्तर यांच्याशी संपर्क साधत सदर घटनेची शहानिशा केली. त्यावेळी जावेद अख्तर यांनी शाहीद बागमधील आपला प्लॅट भाड्याने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी साजिदसह त्याच्या दोन भावांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसी हिसका दाखवताच साजिदने संपूर्ण कहाणी भडाभडा ओकायला सुरूवात करत पत्नी जुहीच्या हत्येची कबुली दिली.

प्रेयसीसाठी बायकोची हत्या

पेशाने इंजिनिअर असलेला साजिद हा सध्या बेरोजगार आहे. शिवाय, त्याचे आणखी एका महिलेशी प्रेमप्रकरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बायको जुहीचा काटा काढून साजिदला आपल्या प्रेयसीसोबत आयुष्य काढायचे होते. शिवाय, प्रेमामध्ये बायको जुहीची आडकाठी नको म्हणून साजिदने त्याच्या दोन भावांच्या साथीने पत्नी जुहीची हत्या करून तिचे ७ तुकडे केले. साजिद आणि जुही हे दोघेही बिहारमधील छपरा जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी २०११ साली लग्न केले होते. पण, प्रेयशीच्या आकांत प्रेमात बुडालेल्या साजिदने अखेर बायकोचा काटा काढला. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावत साजिदसह त्याच्या दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

जुहीची हत्या करून सात तुकडे केल्याच्या घटनेने नवी दिल्ली हादरून गेली आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर प्रकरणाचा छडा जलदगतीने लावत साजिदसह त्याच्या दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, प्रेयसासाठी बायकोचा निर्घृणपणे खून करणाऱ्या साजिदला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता नवी दिल्लीतील नागरिक करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -