घरमुंबईभारतात गरीब आता 'गरीब' राहिला नाही!

भारतात गरीब आता ‘गरीब’ राहिला नाही!

Subscribe

भारताने पहिले स्थान गमावल्याचा आनंद आज संपूर्ण भारतीयांना नक्कीच होणार आहे. नायजेरियासारख्या देशाने भारताला पिछाडीवर टाकले आहे. मे २०१८ अखेरीस भारतातील अत्यंत गरिबीत जगणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. नायजेरियाने भारताला मागे टाकताना त्यांच्याकडे अत्यंत गरिबांची संख्या ८७ दशलक्ष इतकी झाली आहे. तर भारतातील अत्यंत गरिबांची संख्या ७३ दशलक्ष इतकी खाली आली आहे.

जागतिक गरिबीवर काम करणाऱ्या ब्रुकिंग संस्थेच्या अहवालानुसार, भारतातील अत्यंत गरिबांची संख्या कमी होत आहे. जागतिक गरिबी निर्देशांकाचे आकडे भारतासाठी चांगले चित्र निर्माण करत आहेत. नायजेरियात प्रत्येक दोन मिनिटाला १२ आणि एक मिनिटाला ६ व्यक्ती अत्यंत गरिबीच्या रेषेखाली येत आहेत. मात्र भारतातले चित्र आशादायक आहे. भारतात दर एक मिनिटाला ४४ भारतीय अत्यंत गरिबी रेषेतून बाहेर येत आहेत. सध्या भारतात ५.३ टक्के लोक अत्यंत गरिबीत जगत आहेत. भारत सरकारने २०३० सालापर्यंत ठेवलेल्या शाश्वत विकासाच्या दिशेने भारताची आश्वासक पाऊले पडत आहेत.
जेथे अत्यंत गरिबांची संख्या वाढत आहेत अशा जगातील १८ देशांमध्ये १४ देश आफ्रिका खंडातील आहे. आफ्रिका खंडात अत्यंत गरिबांची वाढलेली संख्या ही सध्या पुण्याच्या लोकसंख्येइतकी आहे. २०१८ सालच्या शेवटपर्यंत त्यात ३.२ दशलक्ष लोकांची भर पडणार आहे. भारत जरी शाश्वत विकासाच्या दिशेने अग्रेसर असला तरी इतर अनेक देश विकासाचे लक्ष्य गाठू शकत नाहीत. याचा अर्थ असा की, अत्यंत गरिबी निर्मूलनासाठी जागतिक स्तरावर ठेवण्यात आलेले लक्ष्य गाठण्यासाठी आफ्रिका खंडावर विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

- Advertisement -

भारताची लोकसंख्या १,३२४ अब्ज इतकी आहे. तर नायजेरियाची लोकसंख्या २०० दक्षलक्ष म्हणजे २० कोटी आहे. अत्यंत गरीब लोकांच्या संख्येत भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण लवकरच त्याची जागा कांगो हा आफ्रिकेतील अतिशय गरीब देश घेण्याची शक्यता आहे. भारतातील अत्यंत गरिबांच्या संख्येत होणारी घट हे चित्र भारताला नक्कीच आशादायक आहे. केंद्र सरकारने गरिबी हटवण्यासाठी रोजगार निर्मिती, विकास ही लक्ष्ये ठेवली. त्याची चांगली फळे आता दिसू लागली आहेत.

१) अत्यंत गरीब लोकांच्या यादीत भारत सुमारे तीन वर्षे पहिल्या स्थानावर होता.
२) पहिल्यांदाच भारताचे स्थान या यादीत खाली आले आहे.
३) भारतात दर मिनिटाला ४४ लोक अत्यंत गरिबी रेषेतून बाहेर पडत आहेत.
४) भारताची २०३० सालापर्यंतच्या शाश्वत विकासाच्या दिशेने आश्वासक वाटचाल.

अत्यंत गरिबी रेषेखाली जगातील १८ देश येतात. त्यापैकी १४ देश एकट्या आफ्रिका खंडातील आहेत. आफ्रिका खंडातील अत्यंत गरिबांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न आफ्रिका खंडात करावे लागणार आहेत.
ब्रुकिंग संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -