घरदेश-विदेशआयसीएसई बोर्डाचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर

आयसीएसई बोर्डाचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर

Subscribe

मुंबईच्या जुहीला कजारियाने ९९.३० टक्के गुण मिळवत देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. जुही कजारिया मुंबईच्या जमनाबाई बजाज शाळेची विद्यार्थिनी आहे.

सीबीएसई बोर्डाच्या निकालानंतर आता आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला. आयसीएसई बोर्डाचा १० वी आणि १२ वीचा निकाल आज जाहीर झाला. आज दुपारी तीन वाजता आयसीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे निकाल जाहीर झाले. या बोर्डामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान, आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९८.५४ ऐवढा लागला आहे. तर बारावी परिक्षेचा निकाल ९६.५२ टक्के ऐवढा लागला आहे. मुंबईची जुही कजारिया दहावीच्या परिक्षेत देशामध्ये पहिली आली आहे.

- Advertisement -

मुंबईच्या जुहीला कजारियाने ९९.३० टक्के गुण मिळवत देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. जुही कजारिया मुंबईच्या जमनाबाई बजाज शाळेची विद्यार्थिनी आहे. तर मुंबईच्या अनुश्री चौधरी, फोरम संजनवाला, यश भन्साळी आणि अनुष्का अग्निहोत्रीने ९९.४० टक्के गुण मिळवत देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. आयसीएसई बोर्डाचा निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचतशी सुधारणा झाली आहे. १० वीच्या निकालामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी ०.०३ टक्क्याने तर १२ वीच्या निकालामध्ये ०.३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नागपूरच्या चंदादेवी सराफ शाळेचा श्रीनाथ अगरवाल, गोरेगावच्या विबग्योर हायस्कूलचा झरवान श्रॉफ, जुहूच्या जमनाबाई नर्सी शाळेचा जुगल पटेल, ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलचा ओजस देशपांडे यांनी ९९.२० टक्के गुण मिळवत देशामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर आयसीएसई बोर्डाचा बारावीच्या परीक्षेत कोलकात्याचा देवांग कुमार अगरवाल आणि बंगळुरुची विभा स्वामीनाथन यांनी १०० टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे आयसीएसईच्या परीक्षेत १०० टक्के गुण या आधी कोणालाही मिळालेले नाहीत. आयसीएसई बोर्डाचा निकाल पहाण्यासाठी www.cisce.org संकेतस्थळाला भेट द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -