घरदेश-विदेशGATE 2022 परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात, असा करा अर्ज

GATE 2022 परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात, असा करा अर्ज

Subscribe

ग्रॅज्युएच अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग २०२२ (GATE 2022) परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला २ सप्टेंबरपासून ( २  September 2021) सुरुवात झाली आहे. या परीक्षेसाठी उमेदवार आयआयटी खडगपूर iitkgp.ac.in, gate.iitd.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. (GATE Registration 2022). या परीक्षेसाठी २४ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. उमेदवाराला एक किंवा दोन पेपरसाठी अर्ज करु शकतात पण एकच अर्ज भरता येणार आहे. यंदा गेट २०२२ ची परीक्षा आयआयटी खडगपूरच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहे.

GATE 2022 registration: असा करा अर्ज

गेट २०२२ नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे. या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे सहा टप्पे आहेत.

- Advertisement -

१)  गेट २०२२ ची वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जाऊन उमेदवाराला नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर भरवा लागेल.

२)यावेळी ईमेल वर आलेल्या संख्येच्या आधारे पासवर्ड जनरेट करा. त्यानंतर पुन्हा GATE 2022 नोंदणी प्रक्रिया सुरु करा.

- Advertisement -

३) नोंदणी केल्यानंतर पोर्टलवर पुन्हा एकदा लॉगिन करत वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क क्रमांक अशी माहिती भरा.

४)नंतर आपल्या आवडीनुसार GATE 2022 पेपर आणि GATE परीक्षा केंद्रांची निवड करा. तुम्ही एक किंवा दोन पेपर्ससाठी अर्ज करु शकता. पण एकच अर्ज भरला जाईल.

५) तिसऱ्या टप्प्यात अर्ज यशस्वीरित्या भरल्यानंतर फोटो, सही, आणि श्रेणी प्रमाणपत्राची (लागू असल्यास) स्कॅन कॉपी अपलोड करा.

६) चौथ्या टप्प्यात परीक्षेसाठीचे निर्धारित शुल्क १५०० रुपये भरावे.

अंतिम टप्प्यात अर्ज पुन्हा एकदा तपासून पाहा, तसेच सबमिट केलेली हार्ड कॉपी तुमच्या जवळ सेव्ह करुन ठेवा. जर तुम्ही एकाहून अधिक अर्ज भरले तर स्वीकारले जाणार नाहीत. इतर अर्ज रद्द केले जातील आणि त्याचे शुल्क परत केले जाणार नाही.

GATE Exam Date: गेट २०२२ परीक्षा केव्हा?

गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खडगपूरने दिलेल्या माहितीनुसार, करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो.

Gate 2022 schedule: पाहा संपूर्ण वेळापत्रक

१) गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात- २ सप्टेंबर २०२१

२) रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख- २४ सप्टेंबर २०२१

३) लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख- १ ऑक्टोबर २०२१

४) परीक्षेची तारीख-५,६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२

५) गेट रिझल्टची तारीख- १७ मार्च २०२२


जामिनावर सुटल्यानंतर नारायण राणेंची आज पोलिसांसमोर पहिली हजेरी, पोलीस बंदोबस्त वाढवला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -