घरदेश-विदेशपाकिस्तानच्या अडचणीत वाढ; आधीच कर्जाचा डोंगर त्यात वीज घोटाळ्याचा ठपका

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; आधीच कर्जाचा डोंगर त्यात वीज घोटाळ्याचा ठपका

Subscribe

पाकिस्तानमध्ये वाढच्या वीजेच्या वापराचे कारण शोधण्याच्या नादात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सरकारने चीन – पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (CPEC) च्या माध्यमातून ६३० मिलियन डॉलर म्हणजेच साधारण ४ हजार ७७० कोटी रुपयांहून अधिकचा वीज घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानवर तब्ब ११० कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार वीज क्षेत्रात झालेल्या तोट्याची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान इमरान खान यांनी नेमलेल्या एका समितीने केली असून त्यानुसार चीनच्या खासगी उत्पादकांमधून १०० अरब पाकिस्तानी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – बेरोजगारीचा दर २४ टक्के; पुढील काळ कामगारांसाठी कठीण – CMIE

- Advertisement -

काय आहे घोटाळा 

प्रॉफिट पाकिस्तान टुडे (पीपीटी) या वृत्तसंस्थेने हा घोटाळा उघडकीस आणला असून यामध्ये सीपीईसीचा कुठेही उल्लेख त्यांनी केलेला नाही. पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी अमेरिकेतील एका पोर्टलमध्ये लिहिलेल्या लेखात या भ्रष्टाचाराचा खुलासा करण्यात आल्याचे नमूद आहे. हा घोटाळा सीपीईसी वीज नियामक मंडळाशी जोडलेल्या चीनी व्यापाऱ्यांशी संबंधीत आहे. पीपीटीने दिलेल्या माहितीनुसार नऊ सदस्यिय समितीने २७८ पानांचा अहवाल इमरान खान यांना सादर केला आहे. या अहवालात पाकिस्तानी सरकारला झालेल्या तोट्यासाठी एसओपीच्या उल्लंघनाला जबाबदार ठरवण्यात आले आहे. ज्यामध्ये स्वतंत्र विद्युत उत्पादके (आयपीपी), सरकारी समन्वयाची स्थापना, इंधन शुल्क, वीज दर, डॉलरमध्ये नफ्याची हमी आणि वीज खरेदीच्या काही अटींचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -