घरताज्या घडामोडीकानपुरात दारू प्यायलेला बसचालक अनेक गाड्यांना चिरडून झाला फरार ; 6 जण...

कानपुरात दारू प्यायलेला बसचालक अनेक गाड्यांना चिरडून झाला फरार ; 6 जण जागीच ठार

Subscribe

कानपुरमध्ये काल रात्री टाटमिल चौकाजवळ एका अनियंत्रित इलेक्ट्रीक बसने 17 वाहनांना धडक दिली. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले आहेत. याशिवाय या भीषण अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमींपैकी 7 जणांना कानपुरमधील टाटमिल येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि चार जणांना हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या बसचालकाने अनेक गांड्यांना चिरडले. या भीषण अपघातानंतर बसचालक फरार झाला असून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजव्दारे त्याला शोधण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेने चालवण्यास सुरुवात केली आणि मध्येच जो दिसेल त्याला उडवून निघून गेला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे.

- Advertisement -

अपघातात 6 जणांचा मृत्यू 9 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या परिवहन बसने रिक्षासह अनेक वाहनांना चिरडले. बस चालकाच्या हातातून बस अनियंत्रित झाल्याने मोठा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताबाबत कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

या अपघातात मृत्यु झालेल्यांमध्ये लाटूश रोड याठिकाणी राहणारे रहिवासी होते. येथील २६ वर्षीय शुभम सोनकर, २५ वर्षीय ट्विंकल सोनकर आणि बेकनगंज येथील २४ वर्षीय अरसलान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य मृतांची ओळख पटण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.पोलिस तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत असून, त्यातून हा अपघात कसा घडला याप्रकरणी शोध सुरु आहे.


हे ही वाचा – पाकमध्ये दाखवला जम्मू- काश्मीरचा भाग; WHOच्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -