घरदेश-विदेशAsk Me Everything च्या सेशनमध्ये स्मृती इराणींनी सांगितली त्यांच्या लग्नाची गोष्ट; म्हणाल्या...

Ask Me Everything च्या सेशनमध्ये स्मृती इराणींनी सांगितली त्यांच्या लग्नाची गोष्ट; म्हणाल्या तिला गटारात नका ओढू

Subscribe

केंद्रीय बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आस्क मी एनीथिंगचे (Ask Me Everything ) सेशन आयोजित केले होते.

नवी दिल्ली : भाजपाच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळख असलेल्या स्मृती इराणी नेहमीच चर्चेत असतात. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेला हल्ला सर्वश्रृत आहे. अशातच आता त्यांनी आस्क मी एव्हरीथिंगच्या सेशनमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. स्मृती इराणी यांच्या लग्नाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात. त्यांच्या लग्नाबद्दल ऐकल्या गेले आहे की, त्यांनी त्यांच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या नवऱ्याशी लग्न केले आहे. हाच प्रश्न या सेशनमध्ये एका युजर्सने विचारला असता त्यांनी त्यांबात खुलासा केला आहे.(In the session of Ask Me Everything Smriti Irani told the story of her marriage Said don’t drag her into the sewer)

केंद्रीय बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आस्क मी एनीथिंगचे (Ask Me Everything ) सेशन आयोजित केले होते. यादरम्यान यूजर्सनी स्मृती इराणी यांना त्यांच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफपर्यंतचे प्रश्न विचारले आणि स्मृती इराणींनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही अगदी सोप्या पद्धतीने दिले. दरम्यान, एका युजरने स्मृती इराणी यांना तिचा पती झुबिन इराणी यांच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रश्न केला. या प्रश्नाला त्यांनी न रागवता उत्तर दिले.

- Advertisement -

हेही वाचा : शबाना आझमींनी मेलबर्नमध्ये फडकविला तिरंगा; म्हणाल्या – ध्वजारोहण करणे…

असा केला लग्नाच्या अफवांवर खुलासा

आस्क मी एनिथिंग (Ask Me Everything ) सत्रात विचारलेल्या तिच्या लग्नाच्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी लिहिले की, मोना माझी बालपणीची मैत्रीण नाही, मोना माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे ती माझी बालपणीची मैत्रिण असण्याचा प्रश्नच येत नाही. ती एक पारिवारिक मैत्रिण आहे. राजकारणी नाही, त्यामुळे तिला या गटारात ओढू नका असेही आवाहन तिने यावेळी केले. पुढे त्यांनी माझ्याशी भांडण करा, वाद घालू नका. मला, अपमानित करा, परंतु राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीला गटारात ओढू नका. ती (मोना) ही आदरास पात्र आहे.असेही स्मृती इराणी यांनी यावेळी या सेशनच्या सत्रात लिहले.

- Advertisement -

हेही वाचा : Independence Day 2023 : तिरंग्यातील अशोक चक्राचा रंग निळा का असतो? काय आहे महत्त्व?

राहुल गांधीचे फ्लाईंग किस आणि स्मृती इराणी यांचा हल्ला

संसदेचे सदस्यत्व बहाल झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर बोलताना कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला होता. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी संसदेतील महिला सदस्यांना उद्देशून फ्लाईंग किस केल्याचाही आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर देशभर हा मुद्दा गाजला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -