घरCORONA UPDATEIndia Corona Update : देशात आज कोरोनाचे 71,365 नवे रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट...

India Corona Update : देशात आज कोरोनाचे 71,365 नवे रुग्ण, पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांनी घटला

Subscribe

देशात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रुग्णसंख्या ही दिवसेंदिवस कमी होतेय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 71 हजार 365 नवे रुग्ण आढळले आले. तर 1217 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनिक पॉझिटिव्हीटी रेट आता 4.54 टक्के झाला आहे. यासोबत देशात गेल्या 24 तासात 1 लाख 72 हजार 211 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांनी घटला आहे.

देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 10 हजार 976 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात अॅटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 8 लाख 92 हजार 828 इतकी झाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील अॅटिव्ह रुग्णांची संख्या 8 लाख 92 हजार 828 वर आली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 5 हजार 279 झाली आहे. त्यानंतर 4 कोटी 10 लाख 12 हजार 869 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

- Advertisement -

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले आहे की काल भारतात कोरोना विषाणूसाठी 15 लाख 71 हजार 726 नमुने चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यानंतर कालपर्यंत एकूण 74 कोटी 46 लाख 84 हजार 750 नमुने तपासण्यात आले आहेत.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 170 कोटी कोरोनाविरोधी लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 53 लाख 61 हजार 99 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 170 कोटी 87 लाख 6 हजार 705 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -