घरदेश-विदेशमोदीजी, इंडिया का नंबर कब आएगा ? राहुल गांधींचा थेट सवाल

मोदीजी, इंडिया का नंबर कब आएगा ? राहुल गांधींचा थेट सवाल

Subscribe

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी जगभरात सुरू असलेल्या लसीकरणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे. थेट मोदींना कोरोना लसीकरणाबाबतची माहिती विचारत भारताचा नंबर कधी येणार असा थेट सवाल त्यांनी केला आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या लशीच्या मोहीमेचा दाखला राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये एका ग्राफिकचा वापर करत हा प्रश्न केला आहे. भारत का नंबर कब आएगा मोदी जी ? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, जगभरात एकुण २३ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. चीन, ब्रिटन, अमेरिका आणि रूसने लसीकरणाला सुरूवात केली आहे. भारताचा नंबर कधी येणार मोदीजी असा सवाल त्यांनी केला आहे. भारतात सध्या अनेक कंपन्यांकडून लसीच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तयार होणाऱ्या लशींची माहिती घेत गेल्या काही दिवसांमध्ये पुणे, अहमदाबाद, हैद्राबादचा दौरा केला होता. भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि फायजर या कंपन्यांनी भारताकडे आपत्कालीन परिस्थितीत कोरोनाच्या लशींचा वापर करण्याची परवानगी मागितली आहे. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले आहे की जानेवारीत कोणत्याही हप्त्यात भारतीयांना कोरोनाची लस देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले होते.

आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले होते की, आमचे प्राधान्य हे कोरोना लशीची परिणामकारकता आहे. या लशींच्या बाबतीत आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. त्यामुळे जानेवारीत आम्ही निश्चितच भारतातील नागरिकांना पहिली लस देऊ शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. भारत इतर देशांच्या तुलनेत कोरोनाच्या लशीच्या संशोधनात कुठेही मागे मागे नाही. तसेच भारत कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. अथिशय गंभीरपणे तसेच सखोल असा सर्व आकडेवारीचा अभ्यास आम्ही करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -