घरदेश-विदेशभारत-पाकमध्ये चर्चा होणे अशक्य - परराष्ट्र मंत्रालय

भारत-पाकमध्ये चर्चा होणे अशक्य – परराष्ट्र मंत्रालय

Subscribe

काश्मीरमध्ये पोलीसांच्या झालेल्या हत्येनंतर भारताने ठोस पाऊल उचलले आहे. त्यांनी पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारी चर्चा आता रद्द झाली आहे. पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान या राज्याचे परराष्ट्रमंत्री यांची परस्पर भेट होणार आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे पररराष्ट्रमंत्री मोहम्मद कुरैशी यांच्याच युएन जनरल अॅसेंबलीमधून इतर विषयांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र शुक्रवारी काश्मीरमध्ये झालेल्या पोलीसांच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा बिघडले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत.

- Advertisement -

त्या दोन घटनांमुळे घेतला निर्णय

भाजप सरकारने यापूर्वीही अनेकदा असे म्हटले आहे की दहशतवाद आणि चर्चा हे दोन्हीही एकत्र होणे शक्य नाही. आधी पाकिस्तानला दहशतवादावर अंकुश ठेवावा लागेल, भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या चर्चा न करण्याचा सल्ला दिला आहे. नुकतेच परराष्ट्र मंत्रालय विभागाचे दोन्ही देशांमध्ये आता चर्चा होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दहशतवाद्यांना बनवले हिरो

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी होणाऱ्या चर्चेची घोषणा झाल्यानंतर दोन गंभीर घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानी सुरक्षादलांकडून भारतीय जवानांची निर्घुण हत्या आणि दुसरी म्हणजे पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून पोस्टाचे तिकिट जारी करणे, हे आहेत. त्यामुळे दोनही देशांमध्ये कटुता निर्माण झाली असून त्यांच्याच सामंजस्याने चर्चा होणे शक्य नाही, असे सांगितले जात आहे. पाकिस्तानने भारतात दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकिट जारी करत त्यांना हिरोचा दर्जा दिला होता.

- Advertisement -

पोलीसांच्या हत्येमुळे भारताचा निर्णय 

शोपियांमधून तीन एसपीओसहित पोलीस बेपत्ता झाल्याची खळबळ उडवणारी घटना घडली. या तिन्ही पोलिसांचे अपहरण झालं असावं असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला जात होता. पोलिसांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन देखील सुरु करण्यात आले होते. मात्र जम्मू काश्मीरमधील बेपत्ता झालेल्या तीन पोलिसांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. तर एकाची सुखरुप करण्यात आली आहे. हत्या झालेल्यांमध्ये दोन विशेष पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या तिघांचेही मृतदेह कापरन गावात आढळून आले आहेत. अपहरणानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे. पोलीसांचा मृतदेह कापरन गावात आढळला. अपहरण केलेल्या पोलीसांमध्ये फिरदौस अहमद कूचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी आणि फैयाज अहमद बट यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -