घरCORONA UPDATEIndia Corona Update: गेल्या २४ तासात मृतांच्या आकड्यात घट; ४५,८९२ नव्या रूग्णांचे...

India Corona Update: गेल्या २४ तासात मृतांच्या आकड्यात घट; ४५,८९२ नव्या रूग्णांचे निदान, ८१७ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात बुधवारच्या तुलनेत आज गुरूवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. तर आज कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ हजारांपेक्षा कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी ४३ हजार ७३३ जणांना कोरोनाची लागण झाली तर ९३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आज गुरूवारी देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढून गेल्या २४ तासात ४५ हजाराहून अधिक नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासह ४४ हजार २९१ जणांनी कोरोनावर मात केली असून ८१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट हा ९७.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आठवड्यातील बाधित होणाऱ्या रूग्णांचा दर ५ टक्क्यांनी कमी झाला असून सध्या हा दर २.३७ टक्के इतका झाला आहे. आज देशात गेल्या २४ तासात ४५ हजार ८९२ जणांना कोरोनाची लागण झाली तर ८१७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ४४ हजार २९१ वर पोहचली आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४५ हजारांहून अधिक बाधित आढळ्याने देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ७ लाख ९ हजार ५५७ झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९८ लाख ४३ हजारांहून अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ६० हजार ७०४ इतकी झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ५ हजार २८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३६ कोटी ४८ लाख ४७ हजार ५४९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशभरात ४२ कोटी ५२ लाख २५ हजार ८९७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी ७ जुलै रोजी १८ लाख ९३ हजार ८०० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -