घरदेश-विदेशभारतीयांमध्ये सर्वात जास्त 'विटामिन्स'ची कमतरता !

भारतीयांमध्ये सर्वात जास्त ‘विटामिन्स’ची कमतरता !

Subscribe

'डायग्नॉस्टिक चैन एसआरएल' यांनी केलेल्या ९.५ लाखांपेक्षा अधिक लोकांच्या परीक्षणामधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारतीयांना रोजच्या जेवणातून मिळणाऱ्या आवश्यक विटामिन्सचं प्रमाण सर्वात कमी असल्याची माहिती समोर आले आहे. एका शोध अहवालामध्ये भारतीयांमध्ये विटामिन ए, सी आणि बी १२ तसेच फॉलिक अॅसिडचे प्रमाण कमी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये सर्वात जास्त खराब परिस्थिती ही उत्तर भारतीयांमध्ये आढळली आहे. तर विटामिन बी १ ची सर्वाधिक कमतरता ही दक्षिण भारतात असल्याचं समोर आलं आहे. विटामिन बी २ ची कमतरता ही सर्वाधिक पश्चिम क्षेत्रातील रूग्णांमध्ये आढळली आहे. ‘डायग्नॉस्टिक चैन एसआरएल’ यांनी केलेल्या ९.५ लाखांपेक्षा अधिक लोकांच्या परीक्षणामधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महिला आणि पुरुष या दोघांचेही परीक्षण केल्यानंतर महिलांमध्ये विटामिन ए, बी २ आणि बी ६ ची कमतरता असल्याचे, तर पुरुषांमध्ये विटामिन सी आणि बी १२ ची कमतरता असल्याचे त्यांना आढळून आले.

जीवनशैलीतील बदल कारणीभूत

बदलती जीवनशैली हेच विटामिन्सच्या कमतरतेचे मूलभूत कारण असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. जीवनशैलीतील बदल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे या कमतरता जाणवू लागल्या आहेत. या चुकीच्या सवयींमुळेच भारतीय लोकांमध्ये सध्या विटामिन्सची कमतरता जाणवत आहे. एसआरएलच्या माहितीनुसार, विटामिन ए, सी, बी १, बी ६ आणि बी १२ च्या कमतरतेमुळे भारतीयांमध्ये इतरही गंभीर समस्या उद्भवण्याची भीती आहे. सर्वात जास्त विटामिन्सची कमी उत्तर भारतीय लोकांमध्ये आहे. ही माहिती २०१५ ते २०१८ मध्ये संपूर्ण भारतातील २९ राज्य आणि केंद्रशासिनत प्रदेशातील एसआरएलच्या प्रयोगशाळांनी ९.५ लाखांपेक्षा अधिक सँपलवर हे प्रयोग करून काढली आहे. प्रत्येक वर्गातील लोकांच्या परीक्षणातून काढलेल्या अनुमानानुसार, सर्वाधिक फॉलिक अॅसिडची कमतरता ही साधारण ३१ ते ४५ वर्षीय लोकांमध्ये आढळली आहे. सकाळी नाश्त्यामध्ये पौष्टिक फळं वा भाजी न खाता फास्ट फूड खाल्ल्यामुळे ही कमतरता अधिक प्रमाणात निर्माण होत असल्याचे या अहवालातून सिद्ध करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -