घरदेश-विदेशरेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर

रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर

Subscribe

पाच एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटाची किंमत कमी करण्यात आली असून प्रवाशांसाठी खुशखबर आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेव्यतिरिक्त अन्य क्षेत्रीय रेल्वेनेदेखील किंमत करावी असं सुचवण्यात आलं आहे.

रेल्वेच्या प्रवाशांसाठी नेहमीच रेल्वेचा नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. आता साऊथ वेस्टर्न रेल्वे (एसडब्ल्यूआर)च्या एसी कोचचं भाडं कमी करण्यात आलं आहे. एकूण पाच एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटाची किंमत कमी करण्यात आली असून प्रवाशांसाठी खुशखबर आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करता यावा, प्रोत्साहन मिळावं यासाठी तिकीटदरांमध्ये कपात करण्यात आली आहे.

एसी कोचच्या प्रवशांमध्ये घट होती

नुकत्याच आलेल्या कॅगच्या अहवालानुसार, रेल्वेच्या तिकीटांच्या किमतीमुळं एसी कोचच्या प्रवाशांमध्ये घट झाली होती. आएएनएसनुसार, एसी कोचच्या भाड्यामध्ये डायनॅमिक फेअर फिक्सिंग आणि मागणीच्या उपलब्धतेनुसार कपात करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डानं इतर क्षेत्रीय रेल्वेलादेखील दक्षिण पश्चिम रेल्वेच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेचे प्रवासी वाढावेत हाच यामागचा हेतू आहे.

- Advertisement -

२३५ रुपयांची कपात

फर्स्ट एसीचं भाडं हे साधारण विमानाच्या तिकिटाइतकं गेल्या काही महिन्यात वाढलं होतं. त्यामुळं दक्षिण – पश्चिम रेल्वेनं आपल्या तिकिटाच्या भाड्यामध्ये २३५ रुपये कमी केले आहेत. त्यानुसार इतर क्षेत्रीय रेल्वेदेखील इतकी कपात करेल अशी सध्या आशा आहे. दुसऱ्या ट्रेन्सचं भाडंदेखील कमी झाल्यास, प्रवाशांना याचा जास्त लाभ घेता येईल.

कोणत्या ट्रेन्सचं तिकीट झालं कमी?

१. गदग मुंबई एक्स्प्रेस – गदग मुंबई एक्स्प्रेसच्या एसी कोचचं भाडं ४९५ रुपयांवरून ४३५ करण्यात आलं आहे. ११ नोव्हेंबरपासून हे भाडं लागू होईल.
२. म्हैसूर शिर्डी साप्ताहिक एक्स्प्रेस – म्हैसूर शिर्डी साप्ताहिक एक्स्प्रेसच्या भाड्यात तर चांगलीच कपात करण्यात आली असून ४९५ रुपयांचं तिकीट आता २६० करण्यात आलं आहे. तर म्हैसूर आणि बंगळूरूदरम्यान चालणाऱ्या ट्रेन्सचं भाडं हे ३ डिसेंबरपासून लागू करण्यात येईल.
३. यशवंतपूर बिकानेर एक्स्प्रेस – बंगळूरू आणि हुबळीदरम्यान चालणारी यशवंतरपूर बिकानेर एक्स्प्रेसच्या एससी ३ टायरचं भाडं हे ७३५ वरून ५९० रूपये करण्यात आलं आहे. नवं भाडं ३० नोव्हेंबरपासून लागू करण्यात येईल.
४. यशवंतपूर सिकंदराबाद एक्स्प्रेस – यशवंतपूर सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांना ३४५ रुपयांऐवजी आता ३०५ रुपये भाडं द्यावं लागेल. २२ नोव्हेंबरपासून हा दर लागू करण्यात येईल.
५. यशवंतपूर हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस – आतापर्यंत या ट्रेनचं तिकीट हे ७३५ रुपये होतं, तर आता या तिकिटासाठी ५९० रुपये दर आकारले जातील.
दरम्यान, रेल्वेकडून २५ शताब्दी ट्रेन्सच्या भाड्यातदेखील कपात करण्याचा विचार चालू आहे. दिल्ली ते अजमेर आणि चेन्नई ते म्हैसूरदरम्यान चालणाऱ्या ट्रेन्सचंदेखील भाडं कमी होण्याची शक्यता आहे. ही योजना इतर ट्रेन्समध्येदेखील राबवण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -