घरताज्या घडामोडीभारतीय सैनिकांनी केला दोनदा हल्ला; चीनच्या उलट्या बोंबा

भारतीय सैनिकांनी केला दोनदा हल्ला; चीनच्या उलट्या बोंबा

Subscribe

१९६७ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमक काल झाली आहे. सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये ही चकमक झाल्याची माहितील भारतीय लष्कराने दिली आहे. पण या चकमकीमध्ये एक भारतीय अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहे. तसेच यामध्ये चीनचेही सैनिक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्र्यांच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मोठं विधान केलं आहे. ते भारतावर आरोप करताना म्हणाले की, ‘भारतीय सैनिकांनी सीमेचे उल्लंघन केलं आणि भारतीय सैनिकांकडून दोनदा चिनी सैनिकांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे आम्ही भारतीय सैनिकांना प्रत्युत्तर दिलं.’ पण भारताने चीनचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारतीय सैन्याने सीमारेषा ओलांडली नाही, असं भारताचे चीनला उत्तर दिलं आहे.

माहितीनुसार, सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिका चकमक झाली. ४५ वर्षानंतर काल पहिल्यांदा झालेल्या भारत-चीन चकमकीत भारताने आपले तीन वीरपुत्र गमावले. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे लडाखमध्ये अनेक घटना घडत आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी लडाखाच्या गलवान भागातून चिनी सैन्य अडीच किलोमीटर मागे सरकलं होतं. तसेच त्यांनी वाहने देखील मागे घेतली होती. त्यानंतर भारताने देखील आपलं सैन्य मागे घेतलं होतं. चीननं पूर्व लडाखमध्ये एलएसीजवळ आपले सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला. यात पँगाँग त्सो लेक आणि गॅल्व्हन व्हॅलीचा समावेश आहे. दरम्यान अनेकदा चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य आमनेसामने आलं होत.


हेही वाचा – भारत-चीन सैनिकात चकमक; एक अधिकारी, दोन जवान शहीद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -