घरदेश-विदेशIndia's Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी पाच मध्य आशियातील देशांच्या...

India’s Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी पाच मध्य आशियातील देशांच्या प्रमुख पाच नेत्यांची असणार उपस्थिती

Subscribe

यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मध्य आशिया देशांतील पाच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांतील नेते प्रजासत्ताक दिनी भारतात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या उपस्थित पाच आशियायी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये रविवारी झालेल्या तिसऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. गेल्या आठवड्याच या पाहुणे नेत्यांच्या औपचारिक आमंत्रणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या बैठकीला कझाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुख्तार तिलेउबेर्डी, किर्गिझ प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री रुस्लान काझाकबाएव, ताजिकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सिरोजिद्दीन मुहरिद्दीन, तुर्कमेनिस्तानचे परराष्ट्र मंत्री रशीद मेरेदोव आणि उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री अब्दुलअझीझ कामिलोव्ह उपस्थित होते.

- Advertisement -

कझाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुख्तार टिलेउबर्डी यांनी भारत आणि पाच मध्य आशियाई राष्ट्रांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या संदर्भात पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्या भेटीचा उल्लेख केला.

अमेरिकन भूगर्भ तज्ज्ञांच्या अहवालानुसार, भारतात सध्या थोरियमचा जगातील सर्वाधिक म्हणजे ९ लाख ६३ टन साठा आहे. तसेच युरेनियमचा देखील १ लाख २९ हजार टन साठा आहे. जगातील सर्वाधिक देश उर्जेसाठी थोरियम आणि युरेनियमचा वापर करतात. मात्र हा वापर वाढवण्यासाठी अनेक देश योजना आखत आहेत. या सर्व परिस्थितीत मध्य आशियातील पाच प्रमुख देशांच्या नेत्यांची भारताच्या महत्वाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची हजेरी विशेष आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ मध्ये मध्या आशियायी देशांतील पाच प्रमुख देशांचा दौरा केला होता. सर्वाधिक सर्व मध्य आशियातील देशांचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. यानंतर भारत आणि मध्य आशियातील पाच देश यांच्यात परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर शिखर परिषदेला सुरुवात झाली. यानंतर १८ डिसेंबर आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी आत्तापर्यंत दोन वेळा शिखर परिषद झाली. या परिषदेनंतर जवळपास काही आठवड्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मध्य आशियातील पाच देशांचे नेते पाहुणे म्हणून उपस्थित असतील याची माहिती समोर आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रजासत्ताक दिनी भारतात येणारे परदेशी पाहुणे नेहमी चर्चेचा विषय बनतात. यामुळे भारत आणि संबंधित देशांमध्ये मैत्रीचे संबंध अधिकाधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

२०१५ मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सरकोझी २०१६ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पाहुणे म्हणून भारतात आले होते. यानंतर यूएईचे मोहम्मद बिन जायद अल नाहयान २०१७ मध्ये, दहा आसियान देशांचे नेते २०१८ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामफोसा २०१९ मध्ये आणि ब्राझिलचे जायर बोल्सोनारो २०२० मध्ये प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून भारतात आले होते.

मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन भारतात पाहुणे म्हणून येणार होते. मात्र इंग्लंडमधील कोरोनाची वाढती दहशत पाहता बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द झाला. यापूर्वी २००९ मध्ये मध्य आशियातील कझाकिस्तानचे नेते भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. मात्र त्यानंत मध्य आशियातील एकाही देशाचा नेता प्रजासत्ताक दिनी भारताचा पाहुणा म्हणून आलेच नाहीत.


Omicron Variant : ओमिक्रॉनची दहशत! इस्राईलने अनेक देशांना केले रेड लिस्ट, तर अमेरिकन प्रवासावर बंदीची शक्यता


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -