घरदेश-विदेशParliament budget session 2022 : भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते असतील;...

Parliament budget session 2022 : भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते असतील; लोकसभेत नितीन गडकरींनी केला दावा

Subscribe

भारतात 2024 संपण्यापूर्वी रस्ते पायाभूत सुविधा या अमेरिकेच्या बरोबरीने असतील असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केला आहे. आज लोकसभेत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरु होती. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी म्हणाले की, “जॉन केनेडी यांनी सांगितलेले एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो, ते म्हणजे अमेरिका श्रीमंत आहे म्हणून चांगला आहे असे नाही, तर अमेरिका यासाठी श्रीमंत आहे कारण त्यांच्याकडे चांगले रस्ते आहेत.”

“भारतातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीने”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरे म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी भारताला स्वावलंबी, सुखी, समृद्ध आणि शक्तिशाली भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाच्या आधारे मी या सदनाला आश्वस्त करू इच्छितो की, 2024 वर्ष संपण्यापूर्वी भारतातील रस्ते वाहतूक सेवा सुविधाही अमेरिकेच्या बरोबरीने असेल. यामुळे देशात रोजगार निर्मिती होईल, विकास वाढेल, तसेच पर्यटनही वाढेल, सध्या जम्मू-काश्मीरमध्येच 60 हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे. सध्या जोझिला टनलच्या आत – 8 डिग्री तापमानात एक हजार लोक काम करत आहेत.”

- Advertisement -

“गरीबांच्या पैशातून महामार्ग बांधायचे आहेत”

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, “मला आता गरीब जनतेच्या पैशातून महामार्ग बांधायचा आहे, आमच्याकडे पैशांची कमतरता नाही. बाजारातून पैसा उभा राहतो. Infrastructure Investment Trust (InvIT) साठी मला तुमचे सहकार्य हवे आहे.”

“इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट Infrastructure Investment Trust (InvIT) मॉडेलमध्ये 1000 कोटी रुपयांचा प्रकल्प असेल. यामध्ये आम्ही सर्व गरीब लोकांना सांगू की, जे एनएचआय (NHI(National Highway Institute)च्या बाँडमध्ये पैसे ठेवतील, त्यांनी किमान 7 टक्के रिटर्न मी देईन. बँकेत कुठे FD मध्ये रिटर्न मिळतात. या देशातील गरीब जनतेचा पैसा रस्ता बांधण्यासाठी घेतला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे, आम्हाला सेबीकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.”

- Advertisement -

“सेबीने मान्यता दिल्यास भारतातील गरीब लोकांच्या पैशातून रस्ते बांधले जातील आणि 7 टक्के रिटर्न मिळेल. तुमचा विश्वास आणि प्रेम हीच आमची ताकद असल्याचेही ते म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -