घरदेश-विदेशआयटी कंपनी ‘कॉग्निझंट’ नंतर 'इन्फोसिस'मध्येही कर्मचारी कपात

आयटी कंपनी ‘कॉग्निझंट’ नंतर ‘इन्फोसिस’मध्येही कर्मचारी कपात

Subscribe

वरिष्ठ पदांवरील किमान ५० कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्यात येणार असल्याने वरिष्ठांवर देखील टांगती तलवार

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन कंपनी कॉग्निझंट या कंपनीतील ७ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. कारण कंपनीच्या कॉस्ट कटिंगच्या नावाखाली आगामी महिन्यात ७ हजार मिड-सिनिअर कर्मचाऱ्यांची कपातीच्या निर्णयानंतर इन्फोसिस कंपनी देखील याच वाटेवर असल्याचे दिसते आहे. ज्या प्रकारे कॉग्निझंट कंपनीने कर्मचारी कपात करण्यासाठी जी प्रक्रिया राबवली होती, त्याप्रकारे इन्फोसिसही आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात

यानुसार इन्फोसिस कंपनीतील वरिष्ठ आणि मधल्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार असून इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. या कपातीनुसार इन्फोसिसमधील किमान २२०० कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे. या कपातीमध्ये जॉब लेव्हल ६ (JL6) मधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

इन्फोसिसमध्ये एकूण ८६, ५५८ कर्मचारी असून २२०० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. इन्फोसिसमध्ये JL6, JL7 आणि JL8 मधील श्रेणीत एकूण ३०, ०९२ कर्मचारी आहेत. यासोबत इन्फोसिस JL3 आणि त्या खालील पदांवर काम करणाऱ्या २ ते ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

वरिष्ठ पदांवरील किमान ५० कर्मचाऱ्यांची गच्छंती

इन्फोसिसमध्ये वरिष्ठ पदांवर ९७१ अधिकारी कार्यरत आहे. या वरिष्ठांमध्ये असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, एग्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट असे अधिकारी कर्मचाऱी सहभागी आहेत. यापैकी वरिष्ठ पदांवरील किमान ५० कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्यात येणार असल्याने वरिष्ठांवर देखील टांगती तलवार आहे.


आयटी कंपनी ‘कॉग्निझंट’मध्ये होणार ७ हजार कर्मचाऱ्यांची कपात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -