घरमुंबईपूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

Subscribe

राज्यात निर्माण झालेल्या ओला दुष्काळ आणि कोल्हापूर, साताऱ्यामध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

राज्यात निर्माण झालेल्या ओला दुष्काळ आणि कोल्हापूर, साताऱ्यामध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. तसेच अन्य विद्यापीठानेही असा निर्णय घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले आहे.

…यामुळे घेण्यात आला निर्णय

राज्यातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात आलेला पूर आणि त्यापाठोपाठ आलेला परतीचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे, तर ते शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क कसे भरणार? असा प्रश्न युवासेनेच्या सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे सिनेट बैठकीत उपस्थित केला. युवासेनची मागणी मान्य करत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

विद्यार्थी विकास विभागाकडून विद्यापीठात शिकत असलेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्याना अर्ज करता यावा यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येऊन त्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. – डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व त्यां अंतर्गत कॉलेजने पुरग्रस्त विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावी यासाठी लवकरच युवासेना सीनेट सदस्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे.  – प्रदीप सावंत, सिनेट सदस्य, युवासेना

- Advertisement -

हेही वाचा – एसटीची हंगामी दरवाढ मागे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -