घरदेश-विदेशपळून लग्न केल्याची अशी 'किळसवाणी' शिक्षा

पळून लग्न केल्याची अशी ‘किळसवाणी’ शिक्षा

Subscribe

मुलीने पळून लग्न केल्याचा राग मनात धरून सासऱ्याने जावई आणि मुलीला मारहाण करत मुत्र प्यायला लावले. २५ जुलै रोजी मध्यप्रदेशातील अलिराजपूरमध्ये हा सारा किळसवाणा प्रकार घडला आहे.

प्रतिष्ठा! हा शब्दच सर्व काही सांगून जातो. हीच प्रतिष्ठा जोपासायला लोक मोठी खबरदारी घेतात. त्यातून प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काही घडले तर मग? प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे काही झाल्यास माणसाला प्रचंड राग येतो. माणसाचा राग कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही. रागाच्या भरात तो कोणतं पाऊल उचलेल हे देखील सांगता येत नाही. त्याचाच प्रत्येय आला तो मध्यप्रदेशमध्ये. मुलीने पळून लग्न केल्याचा राग मनात धरून सासऱ्याने जावयाला आणि मुलीला चक्क मुत्र प्यायला लावले. २५ जुलै रोजी मध्यप्रदेशातील अलिराजपूरमध्ये हा सारा किळसवाणा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या काकांसह आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळपासून ३५० किमी अंतरावर असलेल्या हरदासपूर या गावामध्ये हा किळसवाणा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला आहे. मुलीचे वडील करम सिंग आणि हे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते आहेत. तर, आई दुराबाई माजी सरपंच आहे.

काय आहे प्रकरण

नानकी ( १९ वर्षे ) आणि रमेश ऊर्फ हितेश ( २१ वर्षे ) या दोघांचंही प्रेम होते. एकाच गावात राहणाऱ्या या दोघांनीही दोन महिन्यापूर्वी पळून लग्न केले. दरम्यान, दोघांनी केलेले लग्न समाजाविरोधात असल्याचा निर्वाळा आदिवासी पंचायतीने दिला. याप्रकरणामध्ये दंड म्हणून आदिवासी पंचायतीनं रमेशच्या वडिलांना ७० हजार रूपये रोख आणि दोन शेळ्या दंड ठोठावला. पंचायतीने दिलेल्या निर्णयानुसार रमेशच्या वडिलांनी पंचायतीने ठोठावलेला दंड भरला. दरम्यानच्या काळात नानकी आणि रमेश यांनी गुजरात गाठले. त्याठिकाणी दोघांनीही रोजंदारी केली. २४ जुलै रोजी घरगुती कार्यक्रमामुळे दोघेही गावामध्ये परत आले. २५ जुलैच्या रात्री रमेश आणि नानकी रमेशच्या काकांच्या घरी झोपले होते. यावेळी नानकीचे वडील करम सिंग, त्यांचा भाऊ माल सिंग, वाल सिंग आणि इतर तिघे पहाटे ४च्या दरम्यान रमेशच्या काकांच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी रमेशला मारायला सुरूवात केली. नानकीचे केस देखील कापले. यावर न थांबता नानकीच्या वडिलांनी दोघांनाही मुत्र प्यायला लावले. हा सारा प्रकार खूपच किळसवाणा असल्याची प्रतिक्रिया नानकी आणि रमेश यांनी दिली. तसेच पळून जाणं हा समाजाच्या प्रेथेचा भाग असल्याचे रमेशने म्हटले आहे. शिवाय, पंचायतीने ठोठावलेला दंड भरल्यानंतर देखील असा प्रकार घडणे अपेक्षित नसल्याचे रमेशने म्हटले आहे.

- Advertisement -

याविरोधात रमेशनं संबंधितांविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. तर, माल सिंग आणि इतर एकाला पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -