घरदेश-विदेशसर्व बंधने तोडून आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करु - इस्त्रायल

सर्व बंधने तोडून आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करु – इस्त्रायल

Subscribe

'दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करु', असा शब्द इस्त्रायलने भारताला दिला आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सदैव दहशतवादी कारवाया होत असतात. या दहशतवादाचा सर्वनाश करण्यासाठी इस्त्रायल पद्धतीचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु, आता खुद्द इस्त्रायलने आपण दहशतवाद संपवण्यासाठी भारताला सर्वोतोपरी मदत करणार, अशी ग्वाही दिली आहे. शिवाय, दहशतवादाविरोधातल्या भारतासोबतच्या लढाईत आम्ही कोणतीही मर्यादा पाळणार नाही, असेही इस्त्रायलने म्हटले आहे. या मदतीसाठी भारताला कोणतीही अट ठेवणार नाही, असेही इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

‘भारताला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी सज्ज आहोत’

इस्त्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी याविषयीची माहिती दिली आहे. पुलवामा येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात लढत असणाऱ्या भारताला इस्त्रायल मदत करेल का? असा प्रश्न माल्का यांना विचारला गेला. तेव्हा त्यांनी इस्त्रायल भारताला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे, असे म्हटले. यासाठी इस्त्रायल कोणत्याही मर्यादांचा विचार करणार नाही. आम्ही भारतासारख्या आमच्या सच्च्या आणि जवळच्या मित्राला कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहोत, असे माल्का म्हणाले आहेत. दहशतवाद ही फक्त भारत आणि इस्त्रायलची समस्या नसून जगभरात तिचा उपद्रव आहे. त्यामुळे दहशतवादविरोधात आम्ही आमच्या सच्चा मित्राला इस्त्रायली युद्धतंत्र देऊ. त्याशिवाय इस्त्रायलचे अध्यक्ष नेतान्याहू यांनी भारताला हरतऱ्हेचे सहकार्य करण्याची सूचना दिली आहे, असे माल्का यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Pulwama Terror Attack: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘ही अत्यंत भयानक परिस्थिती’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -