घरदेश-विदेशजबलपूर येथे रेल्वेला भीषण अपघात; इंजिनसह रेल्वेचे दोन डबे उलटले

जबलपूर येथे रेल्वेला भीषण अपघात; इंजिनसह रेल्वेचे दोन डबे उलटले

Subscribe

जबलपुर ते अजमेर असा प्रवास करणाऱ्या दयोदय एक्सप्रेसचे इंजिन आणि दोन डबे अचानक रुळावरून घसरून उलटल्याने हा अपघात झाला.

जयपुर येथे शुक्रवारी एक्सप्रेसचे दोन डबे उलटल्याने मोठा अपघात घडला. जबलपुर ते अजमेर असा प्रवास करणाऱ्या दयोदय एक्सप्रेसचे इंजिन आणि दोन डबे अचानक रुळावरून घसरून उलटल्याने हा अपघात झाला. या घटनेत लोको पायलट गंभीर स्वरुपात जखमी झाले असून काही प्रवाशांनाही थोड्याफार प्रमाणात इजा झाली आहे. अपघातामुळे सवाईमाधोपुर- मुंबई रेल्वे ट्रॅक सेवा बाधित झाली असून या अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रेल्वे पायलट गंभीर जखमी 

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सावईमाधोपुर-मुंबई ट्रॅक येथील सांगानेर रेल्वे स्टेशननजीक शुक्रवारी दुपारच्या दरम्यान घडला. त्यावेळी दयोदय एक्सप्रेस जबलपुर ते अजमेर या दिशेने जात होती. याचवेळी सांगानेर रेल्वे स्थानकाजवळ अचानक रेल्वेचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरून उलटले. रेल्वेचे पायलट खेमराज हे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांचे सहाय्यक विजय यांनाही इजा झाल्याचे समजते.

- Advertisement -

या अपघातात कोणाताही प्रवासी जखमी झालेला नाही. लोको पायलट आणि सहलोको पायलट यांना इजा झाली आहे. परंतू त्यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. आता रेल्वे रुळ लवकरात लवकर मोकळा करणे हे आमचे प्राथमिक उद्देश आहे. रेल्वे टीम यामध्ये कार्यरत आहे.
– सौम्या माथुर, डीआरएम

घटनास्थळी पोलीस, प्रशासन दाखल 

अपघातात काही प्रवासीदेखील जखमी झाले असून सुदैवाने कोणालाही गंभीर स्वरुपात इजा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली असून रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून पोलीस आणि प्रशासन अधिकारी देखील तेथे दाखल झाले आहेत. उलटलेल्या रेल्वेच्या इंजिन आणि डब्यांना उभे करण्याचे काम सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -