घरदेश-विदेशकाश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन; ९२ व्या वर्षी...

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन; ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

ज्येष्ठ फुटीरतावादी नेते आणि जम्मू-काश्मीरचे तीन वेळा आमदार असलेले सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन झाले. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष असलेले सय्यद अली शाह गिलानी यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. श्रीनगरच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी गिलानी यांचे निधन झाले. जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले असून कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या.

गिलानी साहेबांच्या निधनाच्या वृत्तानं दुःखी झाले. आमचे बर्‍याच गोष्टींवर सहमत होऊ शकले नाही, पण मी ठामपणे आणि दृढ विश्वासाने आपल्या भूमिकांवर ठाम असले तरी मी त्यांचा आदर करते. अल्लाह त्यानां जन्नत देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना संवेदना, असे लिहून मेहबूबा मुफ्ती यांनी आपले दुःख व्यक्त केले.

- Advertisement -

काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. ते जम्मू-काश्मीर या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील पाकिस्तान समर्थक काश्मिरी फुटीरतावादी नेते असून ज्यांचे त्यांच्या हैदरपोरा निवासस्थानी निधन झाले. ते आधी जमात-ए-इस्लामी काश्मीरचे सदस्य होते, पण नंतर तेहरिक-ए-हुर्रियतची स्थापना केली. सय्यद अली शाह गिलानी यांनी जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी पक्षांचा गटाचे आणि ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्स (APHC) चे अध्यक्ष म्हणून काम केले. ते १९७२, १९७७ आणि १९८७ मध्ये जम्मू -काश्मीरच्या सोपोर मतदारसंघातून आमदार होते. जून २०२० मध्ये त्यांनी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुखपद सोडले. गिलानी बराच काळापासून आजारी होते आणि २००८ पासून त्यांच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी नजरकैदेत होते. गेल्या वर्षी त्यांनी हुर्रियत कॉन्फरन्स (जी) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -