घरताज्या घडामोडीअमरनाथ गुंफेजवळ पूरस्थिती , ४००० भाविकांना केलं रेस्क्यू

अमरनाथ गुंफेजवळ पूरस्थिती , ४००० भाविकांना केलं रेस्क्यू

Subscribe

जम्मू कश्मीरमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली असून अमरनाथ गुंफेजवळ पूरस्थिती निर्माण झाली आहे.

जम्मू कश्मीरमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली असून अमरनाथ गुंफेजवळ पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथील ४००० भाविकांना तेथून तातडीने सुखरुप स्थळी हलवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या ढगफुटीत १६ जणांचा मृत्यू झाला होता. यादुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती.

यावेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहात यात्रेकरूंसाठी उभारण्यात आलेले तंबू वाहून गेले होते. यात अनेक भाविकही वाहून गेले. कोरोनामुळे गेली दोन वर्ष अमरनाथ यात्रा झाली नव्हती. यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले असून पहीला जत्था जूनच्या पहील्या आठवड्यात यात्रेस निघाला होता. त्याचवेळी अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटी झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा या भागात पावसाचा जोर वाढला असून अमरनाथ गुंफेजवळील डोंगराळ भागात दुपारपासूनच पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील नदी नालेही भरले असून आजूबाजूच्या परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर ४००० भाविकांना येथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -