घरदेश-विदेशकेरळमधील 'हे' हॉटेल भारतीयांसाठी नाही!

केरळमधील ‘हे’ हॉटेल भारतीयांसाठी नाही!

Subscribe

हृतिक रोशनचा 'काबील' या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्याबरोबर भेदभाव करण्यात आल्याचा प्रकार केरळमध्ये घडला आहे. केरळमधील एका खासगी हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश नसल्याचे त्यांनी ट्विटरवरून सांगितले आहे.

भारतामध्ये भारतीय हॉटेलमध्ये भारतीयांनाच प्रवेश नसल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. या हॉटेलमध्ये फक्त परदेशी नागरिकांना येण्याची परवानगी असल्याचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाले आहेत. हृतिक रोशनचा ‘काबील’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी हे आरोप केले आहेत. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून त्यांनी केरळमधील त्या हॉटेलचे फोटो शेअर केले आहेत. भारतामध्ये भारतीयांना मिळणाऱ्या अशा वागणूकीचा त्यांनी निषेध केला आहे. पारंतत्र्यात असताना मोठ्या हॉटेल्समध्ये कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश नसल्याच्या पाट्या लागत असत. मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर अजूनही अशाच प्रकारचा भेदभाव सुरु असल्यामुळे लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. संजय गुप्ता हे बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी काबील, जज्बा आणि कांटे अशा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. संजय गुप्ता यांनी आतापर्यंत अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश न मिळाल्याची नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

काय म्हणाले गुप्ता

दिग्दर्शक संजय गुप्ता हे केरळ येथे फिरण्यासाठी गेले होते. या दरम्यान ही घटना घडली. संजय हे कोची येथील ‘सी गुल हॉटेल’मध्ये थांबले होते. हे हॉटेल समुद्रालगत आहे. या हॉटेलमध्ये एकाही भारतीयाला प्रवेश दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की,”या हॉटेलमध्ये माझ्या सोबत भेदभाव केला गेला. समुद्रालगत असलेल्या या हॉटेलमध्ये फक्त परदेशी नागरिक येऊ शकतात. त्यांच्याकडे काही रिकाम्या जागा होत्या मात्र त्यांना जागा मागितल्यावर भारतीयांसाठी जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.” याच बरोबर त्यांनी या हॉटेलचे फोटोही ट्विट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -