घरदेश-विदेशमाझं सरकार पूर्णपणे स्थिर; मी निश्चिंत आहे - कुमारस्वामी

माझं सरकार पूर्णपणे स्थिर; मी निश्चिंत आहे – कुमारस्वामी

Subscribe

भाजपच्या दोन अपक्ष आमदारांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या अपक्ष आमदारंनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या घटनेचा आपल्या सरकारवर काही परिणाम होणार नाही, असे सांगितले आहे. आपले सरकार पुर्णपणे स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये अपक्ष आमदार आर. शंकर आणि एच. नागेश या दोन आमदारांनी काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे आता कर्नाटकमध्ये नव्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपलं सरकार स्थिर असल्याचा दावा केला आहे. अशा प्रकारच्या राजकीय हालचालींमुळे काँग्रेस-जेडीएसच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. परंतु, या दोन आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या अशी कितीने वाढणार आहे? असा कुमारस्वामी यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, या घटनेमुळे आपल्याला काही फरक पडणार नसून ‘मी निश्चिंत आहे’, असे कुमारस्वामी म्हणाले आहेत.

हेही वाचा – कर्नाटक काँग्रेसचे १० आमदार मुंबईतच; भाजप मंत्र्याचा दुजोरा!

- Advertisement -

काय म्हणाले कुमारस्वामी?

कुमारस्वामींनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘या अशा घटनांमुळे आमच्या सत्तेवर काहीच फरक पडणार नाही. मला माझ्या क्षमतेची जाणीव आहे. माझं सरकार हे पूर्णपणे स्थिर असून मी पूर्णपणे निश्चिंत आहे. गेल्या आठवड्यापासून कन्नड वृत्तवाहिन्यांवर जे दाखवले जात आहे, ते पाहून मी आनंद घेत आहे’. दोन आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यांनी भाजपला समर्थन दिले आहे. परंतु, यातून भाजपची संख्या किती संख्येने वाढणार आहे?, असा प्रश्न देखील कुमारस्वी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -