घरदेश-विदेशकर्नाटकात काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

कर्नाटकात काँग्रेसपाठोपाठ जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

Subscribe

कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या सर्वच्या सर्व २१ मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे सुपूर्द केले आहेत.

कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज, सोमवारी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व २१ मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे सुपूर्द केले आहेत. त्यामुळे लवकरच कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यापुर्वीच काँग्रेसच्या १४ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे या सर्व घडामोडींकडे पाहता एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळण्याची शक्यता शनिवारपासून निर्माण झाली आहे. कुमारस्वामी परदेश दौऱ्यावर असताना कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस)च्या सत्ताधारी आघाडीतील १४ आमदारांनी राजीनामा दिले होते. कर्नाटकचे राजकारण हातघाईवर आलं. सरकार वाचवण्यासाठी आघाडीचे नेते निकराचे प्रयत्न करत आहेत, तर संधी मिळताच सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी भाजपचे नेते सज्ज आहेत.

- Advertisement -

भाजप कर्नाटकात सरकार बनवण्याच्या तयारीत

कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची आवश्यकता आहे. परंतु, १३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामींच्या पाठीशी १०५ आमदारांचंच बळ आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी भाजपानं केली आहे. हे निमित्त साधून, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पडत आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळसारख्या दक्षिणी राज्यांना भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याचे आवाहन केले. दक्षिणी राज्य हा भाजपाचा गड बनेल, त्या दिशेनं काम करा, असा सल्लाही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. कर्नाटकमध्ये आम्ही सरकार बनवलं होतं, तरीही म्हटलं जातं भाजपा दक्षिणेत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, तेलंगणा, आंध्र प्रदेश असो वा केरळ, या तिन्ही राज्यांना एक दिवस भाजपाचा गड बनवावा लागेल. या राज्यांतील ५० टक्क्यांहून अधिक मतं भाजपच्या पारड्यात पडायला हवी आहेत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -