घरमनोरंजन'या' चित्रपटातून 'लागीर झालं जी' या मालिकेतील राहुल्याचे पदार्पण

‘या’ चित्रपटातून ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील राहुल्याचे पदार्पण

Subscribe

या चित्रपटात राहुल हा एका वेगळ्या भूमिकेतून प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या चित्रपटात 'लागीर झालं जी'मधली जयडी ऊर्फ किरण ढाणे देखील राहुल्यासोबत पुन्हा एकदा काम करताना दिसणार आहे.

झी मराठी वरील ‘लागीर झालं जी’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहचली होती. या मालिकेतील काही डायलॉग हे खूप प्रसिध्द झाले होते. जसे की ‘लय असत्याल मनमौजी पण लाखात एक माझा फौजी’ हा जसा शीतलचा डायलॉग फेमस झाला होता. या मालिकेतील सगळ्यांपेक्षा वेगळी भूमिका करणार राहुल्या हा देखील त्याच्या वेगळेपणामुळे प्रसिध्द झाला. ‘मला लय कॉन्फिडन्स हाय’ हा त्याचा डायलॉग खूपच फेमस झाला. आता राहुल्या ऊर्फ राहुल मगदुम हा मोठा पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘पळशीची पीटी’ या मराठी चित्रपटातून राहुल आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटात तो पोलीस हवालदार विकास शिंगाडेची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

‘लागीर झालं जी’ या मालिकेत राहुलने आपल्या विनोदीशैलीने सगळ्या प्रेक्षकांची मन जिंकून घेतली होती. साधा-भोळा, एक विशिष्ट देहबोलीमुळे राहुल नावारुपाला आला होता.’पळशीची पीटी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील जयडी उर्फ किरण ढाणे दिसणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटला जगप्रसिध्द ‘कान्स चित्रपट महोत्सव’मध्ये महाराष्ट्र शासनाव्दारे निवडण्यात आले होते. हा चित्रपट ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ‘भागी’ हिला नॅशनल ऍथलेट बनण्याचे स्वप्न असते. ‘भागी’ यासाठी प्रयत्न करत असताना पोलीस हवालदार विकास शिंगाडे हा तिला मदत करतो. धोंडीबा बाळू कारंडे निर्मिती-दिग्दर्शित ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -