घरक्रीडाU19 World Cup : कर्णधाराच्या शतकामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत; वडील आहेत...

U19 World Cup : कर्णधाराच्या शतकामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत; वडील आहेत बीसीसीआयमध्ये

Subscribe

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेली 19 वर्षीय विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे.  या स्पर्धेत भारताने शुक्रवारी नेपाळचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाच्या या यशामागे संघाचा कर्णधार उदय सहारन याचे मोठे योगदान आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या दमदार शतकी खेळी केली. यानंतर आता उदय सहार यांच्याबद्दल माहिती समोर येत आहे. त्याचे वडील बीबीसीआय अंतर्गत प्रशिक्षक म्हणून काम करतात. (U19 World Cup Captain Uday Sahar century takes India to semi finals Father is in BCCI)

हेही वाचा – Jasprit Bumrah : बुमराहची विक्रमी कामगिरी; दुसऱ्या दिवशी भारताने घेतली मोठी आघाडी

- Advertisement -

19 वर्षांखालील विश्वचषकात सध्या सुपर-6 सामने खेळवले जात आहेत. भारताने यापूर्वी सुपर-6 फेरीत न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यानंतर शुक्रवारी नेपाळवर मोठा विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार उदय शरण आणि सचिन धस यांनी दमदार शतके झळकावली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 297 धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून मिळालेल्या 298 धावांचा पाठलाग करताना नेपाळ संघाने सर्वबाद 166 धावांवर आटोपला. यासह भारताने 132 धावांनी विजय मिळवला.

19 वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार उदय सहार याने आपल्या नेतृत्व कौशल्यासोबतच फलंदाजीनेही छाप पाडली आहे. त्याने नेपाळविरुद्ध 107 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. या खेळीमुळे भारतीय संघाने नेपाळविरुद्ध शानदार विजय नोंदवून अंतिम-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत एकामागून एक प्रत्येक सामना जिंकत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ विश्वचषक जिंकणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून रचला इतिहास; सचिननेही म्हटले “यशस्वी भव:”

उदय सहारचे वडील बीसीसीआयमध्ये लेव्हल-1 चे प्रशिक्षक

दरम्यान, कर्णधार उदय सहार याच्या वडिलांचे भारतीय क्रिकेट संघाशी जुने नाते आहे. संजीव सहार हे आयुर्वेदिक डॉक्टर असण्याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळात लेव्हल-1 चे प्रशिक्षक आहेत. उदयला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -