घरदेश-विदेश'काश्मिरी नेते शौचाला जायलाही हुर्रियतची परवानगी घेतात'

‘काश्मिरी नेते शौचाला जायलाही हुर्रियतची परवानगी घेतात’

Subscribe

काश्मीरमधील वातावरण पुन्हा एकदा अस्थिर झाले आहे. काश्मीरच्या घाटी परिसरात फुटिरतावादी संघटनेच्या माथेफिरु कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीच्या घटनेत भारतीय सेनेचा एक जवान शहीद झाला. त्यामुळे वातावरण अधिक तापले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे नेते हुर्रियत या स्थानिक फुटिरतावादी संघटनेची परवानगी नसेल तर शौचालासुद्धा जाऊ शकत नाहीत.

घटना काय?

शुक्रवारी सायंकाळी भारतीय सेनेची एक तुकडी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राजमार्गावरुन अनंतनागला जात होती. त्यावेळी अलगावादी (हुर्रीयत, स्थानिक फुटिरतावादी संघटना) माथेफिरू समर्थकांच्या समुहाने सेनेच्या तुकडीवर दगडफेक केली. या धुमश्चक्रीत सेनेचे जवान राजेंद्र सिंह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जखमी राजेंद्र सिंह यांना सेनेच्या जवानांनी ९२ बेस रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुळचे उत्तराखंडचे असणारे राजेंद्र सिंह यांच्यावर शनिवारी त्यांच्या गावी अंतिम संस्कार करण्यात आले.

- Advertisement -

वाचा – धूम्रपान करणाऱ्यांनो सावधान! आता हवालदार फाडणार पावती

हुर्रीयतवर टिका

या घटनेमुळे हुर्रियत या फुटिरतावादी संघटनेवर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. तसेच केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -