घरट्रेंडिंगवडील तुरुंगात, आई ICUमध्ये.. भूकेने व्याकूळ 4 मुले पोहचले पोलिस ठाण्यात; महिला...

वडील तुरुंगात, आई ICUमध्ये.. भूकेने व्याकूळ 4 मुले पोहचले पोलिस ठाण्यात; महिला पोलिस अधिकाऱ्याने केले ‘असे’

Subscribe

केरळ पोलिसातील एका महिला अधिकाऱ्याने मानवता आणि संवेदनशीलता काय असते याचे दर्शन घडवले. ड्यूटीवर तैनात पोलिस अधिकारी महिलेने एका असाह्य आजारी महिलेच्या नऊ महिन्यांच्या उपाशी बाळाला स्वतः स्तनपान करवले. त्या बाळाची आई जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, तर तिचा पती तुरुंगात आहे. त्यांची चार मुले ही आई-वडील असून पोरकी झाली होती. महिला पोलिस अधिकारीने त्यातील सर्वात लहान बाळाची माता होऊन त्याला स्तनपान केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणा येथून रोजगाराच्या शोधात केरळात आलेलं एक कुटुंब. बऱ्याच वर्षांपासून केरळमध्ये स्थायिक आहे. या कुटुंबातील प्रमुख एका प्रकरणात तुरुंगात आहे. महिलेसह चार मुलांचा सांभाळ करणारं दुसरं कोणीही नाही. त्यामुळे महिला मदतीसाठी कोच्ची सिटी महिला पोलिस स्टेशन येथे पोहचली.

- Advertisement -

महिला आजारी असल्या कारणाने तिला एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची तब्यत आणखी बिघडल्यामुळे चार मुलांच्या आईला अति दक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले. महिला आयुसीयूमध्ये असल्यामुळे तिच्याजवळ एकही मुल थांबू शकत नव्हते.

दुसरीकडे, तीन मुलांच्या जेवणाची व्यवस्था पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी केली. मात्र नऊ महिन्यांचा उपाशी चिमुकला जेव्हा रडायला लागला तेव्हा खाकी वर्दीतील महिलेच्या मनालाही पाझर फुटला. पोलिस अधिकारी एम.ए. आर्या यांनी त्या बाळाला उचलून घेत त्याला छातीशी धरले. बाळाचा टाहो ऐकून त्यांनी ड्यूटी आणि कर्तव्य बाजूला ठेवत मातृत्वधर्माचा सर्वप्रथम विचार केला आणि चिमुकल्याला स्तनपान करवले.

- Advertisement -

कोच्ची सिटी पोलिसांनी आर्या यांच्या या मातृह्रदयी कर्तव्याचे कौतूक केले. पोलिसांनी तो क्षणही कॅमेरात कैद केला, ज्यामध्ये महिला पोलिस आर्या या बाळाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेल्या आहेत. पोलिसांकडून हा फोटो समाज माध्यमावर शेअर देखील करण्यात आला. पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, चारही मुलांची योग्य देखभाल होण्यासाठी त्यांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा : बापरे! बिहारमध्ये महिलेने एकाचवेळी 4 मुलांना दिला जन्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -