घरदेश-विदेशललित मोदीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; अवमानाबद्दल मागितली बिनशर्त माफी

ललित मोदीला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; अवमानाबद्दल मागितली बिनशर्त माफी

Subscribe

 

नवी दिल्लीः इंडियन प्रिमियर लिगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित मोदी याच्याविरोधातील अवमानतेची कारवाई सर्वोच्च न्यायालयाने बंंद केली आहे. ललित मोदीने न्यायालयाचा अवमान करणारे ट्वीट केले होते. याप्रकरणात मोदीने बिनशर्त माफी मागितली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने हे प्रकरणच बंद केले.

- Advertisement -

सी. यू. सिंग यांनी मोदीविरोधात न्यायालयाच्या अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. ललित मोदीने ३० मार्च २०२३ रोजी ट्वीट केले होते. न्यायपालिका आणि न्यायाधीश यांचा अवमान करणारे हे ट्वीट होते. मोदीचे ट्विटरवर ३० लाख तर इंस्टाग्रामवर ४० लाख चाहते आहेत. मोदीच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर न्यायालयाची बदनामी झाली आहे. मोदीविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

या याचिकेत ललित मोदीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागितली. याला याचिकाकर्ते सी. यू. सिंग यांचे वकील मनू सिंग यांनी विरोध तेला. मोदीने सोशल मीडियावर न्यायालयाचा अवमान केला आहे. त्याने सोशल मीडियावरही जाहीर माफी मागावी, अशी मागणी वरीष्ठ वकील सिंघवी यांनी केली. मात्र न्यायालयाने मोदीच्या बिनशर्त माफीची नोंद करुन घेतली. यापुढे न्यायालयाचा अवमान होईल असे वक्तव्य करु नका, असे बजावत सर्वोच् न्यायालयाने मोदीच्या विरोधातील अवमानतेची करवाई बंद केली.

- Advertisement -

दरम्यान, फरार म्हटल्याप्रकरणी मोदीने ब्रिटन कोर्टात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ”राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत. परंतू त्यांच्याकडे याबाबत काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत. मी या विरोधात राहुल गांधींवर युकेच्या कोर्टात खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की ते माझ्याविरोधात सर्व ठोस पुरावे घेऊन येतील. राहुल गांधी स्वत:ला कसे मुर्ख बनवून घेतात हे मला पहायचे आहे. आर के धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा, एनडी तिवारी हे सर्व गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. यांच्या परदेशात मालमत्या कशा आहेत? हे कमलनाथना विचारा”, असे ललित मोदीने म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -