घरक्रीडाब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; महिला कुस्तीपटू सर्वोच्च न्यायालयात

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी; महिला कुस्तीपटू सर्वोच्च न्यायालयात

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) पोहचले असून ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

- Advertisement -

जानेवारीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निरीक्षण समितीने आपला अहवाल सादर केला आहे. यानुसार निरीक्षण समितीला तीन गोष्टी आढळल्या आहेत, पहिली म्हणजे लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य मंच आणि प्रक्रिया खेळाडूंसाठी उपलब्ध नाही. दुसरी म्हणजे कुस्ती संघटना आणि खेळाडूंसह सर्व संबंधितांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे संघ आणि खेळाडू यांच्यात चांगला संवाद असायला हवा, या निरीक्षणासह पर्यवेक्षण समितीचे काम संपुष्टात आले आहे. त्यामुळे येत्या ७ मे रोजी युनियनची होणारी निवडणूक रद्द करण्यात आली आल्यामुळे आता नव्याने निवडणुका होणार आहेत. भारतीय ओलंपिक एसोसिएशने (IOA) समिती स्थापन केली असून 45 दिवसांत कुस्ती महारसंघाच्या निवडणुका पूर्ण करणार आहेत. तोपर्यंत संघाचे कामही तदर्थ समिती (Ad Hoc) पाहणार आहे.

जंतरमंतरवर ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. 7 महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत 21 एप्रिल रोजी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरोधात तक्रार देऊनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला कुस्तीपटूंनी रविवारी (23 एप्रिल) उशिरा सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -