घरताज्या घडामोडीकोरोना विषाणू हवेतून पसरतोय, कोरोनाची नियमावली त्वरीत बदला - द लॅन्सेट रिपोर्ट

कोरोना विषाणू हवेतून पसरतोय, कोरोनाची नियमावली त्वरीत बदला – द लॅन्सेट रिपोर्ट

Subscribe

जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी लाट पसरली आहे. कोरोनाची वेगवेगळी रुप पाहायला मिळत आहे. कोरोना काळाच्या सुरुवातीपासूनच अनेक संशोधक अभ्यास करत आहेत. यादरम्यान कोरोना संदर्भातले अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. आता कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा जगप्रसिद्ध वैद्यकीय जर्नल द लॅन्सेटने आपल्या एका अहवालातून केला आहे. तसेच आता जी कोरोना नियमावली आहे, त्यामध्ये त्वरीत बदल करण्याचा गरज असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

द लॅन्सेटचा हा नवा अहवाल इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांनी तयार केला. यामध्ये युनिवर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर आणि कोऑपरेटिव्ह इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन इन्वायर्नमेंटल साइंसचे केमिस्ट होजे-लुझस जिमेनेज यांचा देखील समावेश आहे. कोरोना विषाणू हवेतून पसरत नाही, हे सिद्ध करण्याकरिता पुरेसे पुरावे नाहीत, असे अहवालातून सांगण्यात आले आहे. पण हा विषाणू हवेतून कसा पसरतोय, हे सिद्ध करण्यासाठी १० कारणे दिली आहेत. अनेक शास्त्रज्ञांनी यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे हा नव्या अहवालानुसार कोरोनाची नियमावली बदलावी, अशी सूचना देण्यात आली आहेत

- Advertisement -

कोरोना हवेतून पसरण्याची १० कारणे

१. कोरोनाचे सुपरस्प्रेडिंग इव्हेंट SARS-COV-2 विषाणूला अधिक वेगाने फैलाव पसरवतात. कोरोना महामारीचे हे सुरुवातीचे वाहक असू शकतात. असा फैलाव थेंबांऐवजी हवेतून सहजरित्या होणे शक्य आहे.
२. उदाहरणार्थ, क्वारंटाईन हॉटेलमध्ये जवळ-जवळ असलेल्या खोल्यांमधील व्यक्तीत कोरोना विषाणू आढळला. जरी हे व्यक्ती एकमेकांच्या खोल्यांमध्ये गेले नाहीत तरीही कोरोनाचा प्रसार तिथे आढळला.
३. सर्व कोरोना रुग्णांपैकी ३३ ते ५९ टक्के खोकला आणि शिंका येत नसलेल्या म्हणजेच लक्षणे नसलेल्या किंवा लक्षणे असलेल्या ट्रान्समिशनसाठी जबाबदार असू शकतात, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
४. कोरोना विषाणूचा प्रसार हे बाहेरपेक्षा घरामध्ये जास्त होते आणि जर योग्य पद्धतीत घरामध्ये व्हेंटिलेशन असले तर विषाणूचा प्रसार कमी होतो.
५. सध्या आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करताना आपल्या सुरक्षितेसाठी पीपीई किट वापरतात. पण पीपीई कीट वापरल्याच्या ठिकाणी नोसोकॉमियल इन्फेन्शन आढळते. कोरोनाशी थेट संपर्क येऊन नये याकरता पीपीई कीट वापरले जाते. पण हवेतून विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी कोणताही मार्ग नाही आहे.
६. SARS-COV-2 विषाणू हवेमध्ये आढळला आहे. हा विषाणू लॅबमध्ये कमीत कमी ३ तास आणि हवेत संसर्गजन्य राहिले. हा विषाणू कोरोना रुग्णाची खोल आणि कारमधल्या हवेत आढळला आहे.
७. तसेच कोविड रुग्ण असलेल्या रुग्णालयातील एअर फिल्टर्स आणि इमारतीच्या नळांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. अशा ठिकाणी फक्त विषाणू हवेच्याद्वारे पोहोचू शकतो.
८. तज्ज्ञांनी म्हणण्यानुसार, पिंजऱ्यांमध्ये बंद असलेल्या प्राण्यांचा अभ्यास केला असता तिथल्या प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू आढळला. हे फक्त हवेच्या माध्यमातून झाल्याचे दर्शवले आहे.
९. पण कोरोना हवेतून पसरत नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नाही, असे तज्ज्ञ म्हणाले आहेत.
१०. श्वासोच्छवासाच्या थेंबातून कोरोना पसरतो आणि इतर मार्गांने देखील पसरतो, याचे पुरावे आहेत. पण अजून इतर मार्गांनी तो पसरू शकतो, याचे पुरेसे पुरावे नाही आहेत, असा अखेरचा युक्तिवाद करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -